सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

थावरचंद गहलोत यांनी सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाच्या सर्व योजनांचा कृती आराखडा 2020-21 प्रसिद्ध केला


यावर्षी सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाच्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल : थावरचंद गहलोत

Posted On: 09 SEP 2020 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी 7 सप्टेंबर, 2020 रोजी सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाच्या सर्व योजनांचा 33 कृती आराखडा  2020-21 समाविष्ट असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले. प्रथमच सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाने प्रत्येक योजनेसाठी सर्वसमावेशक वार्षिक कृती आराखडा 2020-21 हाती घेतला  आहे आणि केंद्र सरकार, सहभागी राज्य सरकारे व स्वयंसेवी संस्थांना स्पष्ट लक्ष्य आणि  टप्पे ठरवून देणे हा यामागील उद्देश आहे. या पुस्तकात सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभागाच्या 33 वार्षिक कृती आराखड्यांचे संकलन आहे . अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि ज्येष्ठ नागरिक, अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती, तृतीयपंथीय , भटक्या विमुक्त जमाती मधील लोकांचे  आर्थिक, शैक्षणिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना गहलोत म्हणाले की, वार्षिक कृती आराखडा 2020-21अंतर्गत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास व पुनर्वसन कार्यक्रम राबवून गरीब व वंचित गटातील सदस्यांचे सक्षमीकरण केले जाईल असा  समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र  सरकार कटिबद्ध आहे. 2019-20  या आर्थिक वर्षात विविध योजनांमध्ये 2.35 कोटी लाभार्थ्यांसह एकूण 8602.53 कोटी रुपये खर्च झाले तर चालू आर्थिक वर्षात ही तरतूद  9933.33 कोटी रुपये (15.46 %  वाढ) आणि लाभार्थ्यांची संख्या अंदाजित 4.91  (कोटी लाभार्थी (110.6%वाढ) इतकी वाढवण्यात आली.  विभागाच्या स्वप्नांच्या दिशेने  आणि नवीन भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने  आपल्या प्रवासात हा  एक मैलाचा दगड ठरेल असे ते म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652830) अभ्यागत कक्ष : 182