युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) कोलकाता प्रादेशिक केंद्रामध्ये ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ला ‘पद्मश्री पुरस्कार विजेती बुला चौधरी यांनी दाखवला झेंडा

Posted On: 09 SEP 2020 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) कोलकाता प्रादेशिक केंद्राच्या वतीने नेताजी सुभाष ईस्टर्न सेंटर येथे आज सकाळी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ अर्जुन पुरस्कार आणि  ‘पद्मश्री पुरस्कार विजेतीजलतरणपटू, बुला चैधरी यांच्या उपस्थितीत झाला. बुला चौधरी या पाच समुद्री खाड्यांमध्ये पोहणा-या पहिल्या महिला जलतरणपटू आहेत.

या कार्यक्रमाला प्रादेशिक केंद्राचे सर्व कर्मचारी, अधिकारी, प्रशिक्षक तसेच प्रभारी क्षेत्रीय संचालक विनीत कुमार उपस्थित होते.

केवळ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तंदुरूस्त- स्वस्थ्य राहिले पाहिजे, असे नाही. तर आपल्या संपूर्ण देशाची उभारणी चांगली व्हावी, यासाठी निरोगी असणे गरजेचे आहे. कोविड-19 महामारी आली म्हणून आपण आता तंदुरूस्त राहिले पाहिजे, असे अजिबात नाही. तर यानंतरच्या काळातही तंदुरूस्तीकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे बुला चौधरी यांनी यावेळी सांगितले. आपण स्वतः तंदुरूस्त राहिलो तर आपले कुटुंबही आरोग्यपूर्ण राहील, आणि या प्रक्रियेमुळे संपूर्ण भारत तंदुरूस्त असेल. फिटनेस राहण्यासाठी प्रत्येकाने रोज काहीना काही शारीरिक व्यायामासारखे उपक्रम केले पाहिजेत, असे चौधरी यांनी सांगितले.

एसएआय केंद्राच्या बाहेर सॉल्ट लेक परिसरामध्ये शारीरिक व्यायाम आणि तंदुरूस्ती यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व क्षेत्रातल्या सर्व राष्ट्रीय केंद्रे, एसएआय प्रशिक्षण केंद्रे, आणि खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रानेही आज सकाळी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’चे आयोजन केले होते. यामध्ये पुढील केंद्रांचा समावेश आहे.

 

1.    एनसीओई जगतपूर

 

2.    एसटीसी अगरतळा

 

3.    एसटीसी बोलपूर

 

4.    एसटीसी बर्दवान

 

5.    एसटीसी कटक

 

6.    एसटीसी धेंकानल

 

7.    एसटीसी गिधौर

 

8.    एसटीसी हजारीबाग

 

9.    एसटीसी जलपैगुडी

 

10.    एसटीसी किशनगंज

 

11.    एसटीसी लेबाँग

 

12.    एसटीसी पाटणा

 

13.    एसटीसी पोर्ट ब्लेअर

 

14.    एसटीसी रांची

 

15.    एसटीसी सुंदरगड

 

B.Gokhale /S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652759) Visitor Counter : 137