शिक्षण मंत्रालय

शिक्षण मंत्रालय शिक्षक पर्व उपक्रमांतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षणासंबंधी 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी परिषदेला संबोधित करणार

Posted On: 09 SEP 2020 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

शिक्षणमंत्रालय शिक्षक पर्व उपक्रमांतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षण यावर 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय परिषदेचे ऑनलाईन माध्यमातून आयोजन करणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी, प्राचार्य आणि शिक्षकांवर लक्ष केंद्रीत असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील काही घटकांची त्यांनी यापूर्वीच कशी सर्जनशील पद्धतींनी अंमलबजावणी केली आहे, त्याविषयी चर्चा करण्यात येईल. राष्ट्रीय पारितोषक विजेते शिक्षक आणि इतर सर्जनशील शिक्षकांचा परिषदेत सहभाग असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला 11 सप्टेंबर 2020 रोजी संबोधित करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तन सुधारणांसंबंधीच्या परिषेदला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले होते.

दोन दिवसाच्या परिषदेत तज्ज्ञांकडून एनईपीच्या शालेय शिक्षण संकल्पनेविषयी महत्त्वपूर्ण संकल्पनांचा उलगडा करण्यात येणार आहे. MyGov या पोर्टलवर शिक्षकांकडून आलेल्या काही सूचना सामायिक करण्यात येणार आहेत.

शिक्षक पर्व शिक्षकांचा सत्कार आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 पुढे नेण्यासाठी 8 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2020 या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. मंत्रालयाकडून एनईपी आणि अंमलबजावणीविषयी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेबिनारमध्ये, तज्ज्ञांकडून एनईपीच्या महत्वपूर्ण संकल्पनांविषयी चर्चा करण्यात येईल. प्रत्येक संकल्पना शिक्षण प्रणालीच्या भागधारकांच्या वेगवेगळ्या घटकांना समोर ठेवून सादर करण्यात येईल; तथापि, सर्व शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरेल.  

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652720) Visitor Counter : 219