कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते 9 राज्यात 22 बांबू क्लस्टरचे उद्घाटन; नॅशनल बांबू मिशनच्या लोगोचे देखील अनावरण


बांबू उत्पादनांच्या निर्यातवाढीकडे भारताची वाटचाल, स्थानिक उद्योजकांची प्रगती हे पंतप्रधानांचे ध्येय  - केंद्रीय कृषिमंत्री

Posted On: 08 SEP 2020 7:29PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायती राजमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज 9 राज्ये (गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, नागालँड, त्रिपुरा, उत्तराखंड आणि कर्नाटक) मधील 22 बांबू क्लस्टरचे व्हर्चुअल माध्यमातून उद्घाटन केले.

राष्ट्रीय बांबू मिशनचा लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय बांबू मिशनच्या यशाचे कौतुक करताना तोमर म्हणाले की, बांबूच्या उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी आता देश तयार झाला आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सला संबोधित करताना केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले की, स्थानिक कारागीरांना उदरनिर्वाहाचे साधन मिळावे यासाठी स्थानिक उद्योगांचे रक्षण केले पाहिजे आणि प्रगती केली पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.

बांबू क्षेत्रातील सरकारचे उद्दीष्ट बांबू मिशनच्या सर्व भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांनी साधले जात आहे. बांबूचे महत्त्व लक्षात घेऊन वर्ष 2017 मध्ये वृक्षांच्या श्रेणीमधून बांबू काढून टाकण्यासाठी भारतीय वन अधिनियम 1972 मध्ये सुधारणा करण्यात आली, परिणामी आता कोणीही बांबू आणि त्याच्या उत्पादनांमध्ये लागवड व व्यवसाय करू शकेल. देशातील बांबू उद्योगाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आयात धोरणातही बदल करण्यात आला आहे. तोमर म्हणाले की बांबूचा वापर ही भारतातील एक प्राचीन परंपरा आहे आणि आता याला आधुनिक तंत्रज्ञानाचा पाठिंबा आहे. बांबू उद्योगासाठी तरूणांना प्रशिक्षणही दिले जात आहे. बांबू मिशनची उपयुक्तता लक्षात घेऊन आयात धोरणाच्या बदलाबरोबरच सरकार वेगवान कार्य करीत आहे, ज्यामुळे हा व्यवसाय वाढत आहे आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध आहेत.

तोमर म्हणाले की, देशात एक असे मोठे क्षेत्र आहे जिथे पिकाची लागवड करता येत नाही परंतु बांबूचे उत्पादन करता येते.  प्राचीन काळीसुद्धा लोक त्यांच्या घरासाठी बांबू वापरत असत, ते घरी सुरक्षित रहायचे. सरकारच्या माध्यमातून जुन्या पद्धती आता नवीन तंत्रज्ञानाने विकसित केल्या जात आहेत. बांबू मिशनही राज्ये गांभीर्याने घेत आहेत. आमचे कारागीरही कुशल आहेत, ज्यांच्या या दिशेने प्रगती केल्याने भारताच्या निर्यातीत वाढ होईल.

कार्यक्रमाला कृषी राज्यमंत्री परशोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी उपस्थित होते. राष्ट्रीय बांबू मिशनचा अधिकृत लोगो तयार करण्यासाठी मायजीओव्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली गेली होती. देशभरातून प्राप्त झालेल्या 2033 प्रवेशांपैकी तेलंगणाच्या श्री साई राम गौड एडिगी यांनी विकसित केलेल्या डिझाईनची निवड करुन त्यांना रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. लोगो तपशील: बांबू, ग्रामीण भारतातील शेतकरी आणि उद्योगासाठी देखील तितकाच महत्त्वपूर्ण राहिला आहे.

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652424) Visitor Counter : 257