पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

निळ्या आकाशासाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या वेबिनारचे आयोजन

Posted On: 06 SEP 2020 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  6 सप्टेंबर  2020

 

केंद्रीय पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या,7 सप्टेंबर  2020  रोजी निळ्या आकाशासाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

जावडेकर या वेबिनार दरम्यान राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतील. खालील लिंकवरून वेबिनारमध्ये  थेट सहभागी होता येईल.

https://youtu.be/lHDTNbaAZ2c

या वेबिनारमध्ये  28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे नगरविकास आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सहभागी  होतील. एनसीएपी कार्यक्रमातल्या निवडक 122  शहरांचे आयुक्तही यात सहभागी होतील.

उल्लेखनीय आहे की पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी या वर्षी  स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात 100 शहरांमध्ये वायु गुणवत्तेत सर्वांगीण सुधारणेची गरज अधोरेखित केली होती.

19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेने  2020 पासून दरवर्षी 07 सप्टेंबरला निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651872) Visitor Counter : 154