आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य मंत्रालयाचे केंद्रीय पथक पंजाब आणि चंदिगडमध्ये
कोविडची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी या पथकाचा 10 दिवसचा मुक्काम
Posted On:
06 SEP 2020 3:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2020
केंद्रीय पथक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिबंधात्मक योजना ,सुरक्षितता आणि चाचण्या यांच्यावर लक्ष ठेवून कोविड-19 विरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला मदत करणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथे उच्चस्तरीय केंद्रीय पथके तैनात करण्याचे ठरविले आहे.
ही उच्चस्तरीय पथके राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिबंधात्मक सुरक्षितता, चाचण्या आणि कोविडच्या रुग्णांचे प्रभावी आरोग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि मृत्युदर कमी करून जीव वाचविण्याच्या हेतूने मदत करतील. ही पथके राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशात वेळेवर आरोग्य चिकित्सा करून आणि त्याचा पाठपुरावा करून प्रभावीपणे या आव्हानाला तोंड देण्यासाठी मार्गदर्शन करेल.
या द्विसदस्यीय पथकात, चंदीगड येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेतील( PGIMER )एक तज्ञ आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रातील(NCDC) साथीच्या रोगाचे तज्ञ यांचा समावेश असेल.ही पथके दहा दिवस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राहून कोविड व्यवस्थापनासाठी अधिक मार्गदर्शन करेल.
पंजाब मधे एकूण 60,613 रूग्ण आढळले असून त्यापैकी आजपर्यंत 15,731 सक्रिय रूग्ण आहेत आणि आतापर्यंत 1739 रूग्ण मरण पावले आहेत.रोगाची चाचणी करण्याचा दर दहा लाखांत 37546आहे(भारतात सरासरी दर दहा लाखांत 34593.1 इतका) आहे.एकूण सकारात्मक दर 4.97%च्या आसपास आहे.
केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथे सध्या 2095 रूग्ण सक्रीय असून एकूण रूग्णसंख्या 5268आहे. चाचण्यांचा वेग दर दहा लाखांत 38054 एकूण सकारात्मक दर 11.99%इतका आहे.
केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्वतोपरी सक्रीय सहकार्य करत असून कोविडच्या रूग्णांत अचानक होणारी वाढ आणि मृत्यु दरात होणाऱ्या वाढी विरोधात विविध क्षेत्रीय उपाययोजना राबवत आहे.गेल्या दोन दिवसांपासून विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आणि जिल्हातील रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीकडे आणि वाढणाऱ्या मृत्युदरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे.सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सक्रीयपणे सर्वसमावेशक उपाययोजना करून रोगाच्या प्रसाराची साखळी तोडून म्रुत्यूदर 1%पेक्षा कमी करायला सांगितले
B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651779)
Visitor Counter : 258