रेल्वे मंत्रालय

पीयुष गोयल यांनी रेल्वे मालवाहतूक आणि पार्सल सेवेसाठी मजबूत भागीदारीसंदर्भात देशातील आघाडीच्या कुरिअर/ पुरक सेवा प्रदात्यांसोबत बैठक घेतली


रेल्वेकडून कुरिअर/पुरक सेवा प्रदात्यांना विश्वसनीय, जलद, परवडणारी आणि हाताळण्यास सुलभ पार्सल सेवा दिली जाणार

Posted On: 03 SEP 2020 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 सप्टेंबर  2020

 

रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वे मालवाहतूक आणि पार्सल सेवेसाठी मजबूत भागीदारीसंदर्भात देशातील आघाडीच्या कुरिअर/ पुरक सेवा प्रदात्यांसोबत बैठक घेतली.

बैठकीदरम्यान, रेल्वे पूरक सेवा/ कुरिअर सेवा प्रदात्यांना विश्वसनीय, जलद, परवडणारी, हाताळण्यास सुलभ अशी पार्सल सेवा पुरवण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले.

भारतीय रेल्वेमार्फत खासगी पार्सल सेवांचा व्यवसाय वाढविण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती.

उत्तम नियमावलीवर जलद काम करण्यासाठी आणि कार्यसुलभतेसाठी, रेल्वेचे अधिकारी आणि पूरक सेवा/कुरिअर सेवांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त कार्यगटाची स्थापना करण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना मंत्री म्हणाले, सर्वांसाठी शाश्वत व्यवसाय विकास साध्य करण्यासाठी सर्वांच्या सोयीचे उपाय शोधले पाहिजेत.

भारतीय रेल्वेने 22.03.2020 ते 02.09.2020 या काळात 5,292 पार्सल रेल्वे चालवल्या, ज्यापैकी 5,139 रेल्वेंसाठी नियोजीत वेळापत्रक होते. या रेल्वेंमध्ये एकूण 3,18,453 टन मालांची वाहतूक करण्यात आली आणि यापासून 116.19 कोटी रुपये उत्पन्न मिळाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय रेल्वेने 94.33 दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी गेल्यावर्षीच्या याच महिन्यातील मालवाहतुकीपेक्षा अधिक आहे. 451.38 दशलक्ष टन वजन मालवाहतूक एकूण 1,41,049 रेक्समधून 25.03.2020 ते 01.09.2020 या काळात करण्यात आली. भारतीय रेल्वेने दिलेल्या सवलतींमुळे रेल्वे मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालवाहतुकीसंबंधीच्या सुधारणा आगामी शून्याधारीत वेळापत्रकात समाविष्ट केल्या जातील.  

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1651010) Visitor Counter : 128