गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिशन कर्मयोगी, नागरी सेवांतील क्षमता वृद्धीसाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या मंजुरीचे स्वागत केले


अमित शाह यांनी दूरदर्शी सुधारणांकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले

मिशन कर्मयोगीचा नागरी सेवांमध्ये मुलभूत परिवर्तन घडवून आणणे हा उद्देश

सर्वांगीण आणि व्यापक योजना, जी वैयक्तिक आणि संस्थात्मक क्षमता वृद्धीवर लक्ष केंद्रीत करेल

21 व्या शतकासाठीच्या ऐतिहासिक सुधारणेमुळे गटा-तटाची कार्यपद्धती नष्ट होऊन नवीन कार्यसंस्कृती उदयाला येईल

निर्धारीत ध्येय आणि निरंतर प्रशिक्षण प्रणालीमुळे जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी शासकीय कर्मचारी सक्षम आणि संवेदनशील बनतील

ही सुधारणा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केवळ एक यंत्रणा प्रदान करणार नाही तर त्यांना नवभारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करेल

मोदी सरकार भविष्यातील नागरी सेवांच्या निर्मितीसाठी कटीबद्ध, नवभारतासाठी सनदी सेवा

Posted On: 02 SEP 2020 10:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुर केलेल्या मिशन कर्मयोगी या नागरी सेवांतील क्षमता वृद्धीसाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. हा नागरी सेवांतील मुलभूत बदल आहे, असे ते म्हणाले. 

अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती या दुरदर्शी सुधारणांसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या सर्वांगिण आणि व्यापक योजनेमुळे वैयक्तिक आणि संस्थात्मक क्षमता वृद्धीवर लक्ष केंद्रीत होईल, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, हा 21 व्या शतकासाठीचा ऐतिहासिक बदल आहे. ज्यामुळे गटा-तटाची कार्यपद्धती संपुष्टात येऊन नवीन कार्यसंस्कृती उदयाला येईल. निर्धारीत ध्येय आणि निरंतर प्रशिक्षण प्रणालीमुळे जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी शासकीय कर्मचारी सक्षम आणि संवेदनशील बनतील.

अमित शाह म्हणाले, ही सुधारणा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केवळ एक यंत्रणा प्रदान करणार नाही तर त्यांना नवभारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करेल.

मोदी सरकार भविष्यातील नागरी सेवांच्या निर्मितीसाठी कटीबद्ध आहे, नवभारतासाठी नागरी सेवा, असे ते म्हणाले.

एनपीसीएससीबीचा आराखडा अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे, नागरी अधिकाऱ्यांनी जगातील सर्वोत्तम संस्थाकडून शिकत, चांगल्या बाबी स्वीकारत असताना भारतीय संस्कृती आणि संवेदनशीलता आणि तळागाळाशी संपर्क ठेवणे यासाठी क्षमतावृद्धी करण्यासाठीचा पाया आहे. हा कार्यक्रम एकात्मिक ऑनलाईन ट्रेनिंग प्लॅटफॉर्म “iGOTKarmayogi” च्या माध्यमातून साकारला जाईल. 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना यात समावेश करण्यात येईल, यासाठी 510.86 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.     

To bring a transformational change in civil services, cabinet today approved #MissionKarmayogi. I thank PM @NarendraModi ji for this visionary reform. This holistic & comprehensive scheme will focus on individual aswell as institutional capacity building. #CivilService4NewIndia

— Amit Shah (@AmitShah) September 2, 2020

***

G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650840) Visitor Counter : 192