नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

भारतीय उर्जाक्षेत्र पर्यावरणपूरकतेच्या दिशेने


केंद्रीय ऊर्जामंत्र्यांव्दारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मध्यमातून ग्रीन टर्म अहेड मार्केटचा (जीटीएएम) प्रारंभ

जगातील अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी बाजारपेठ हे प्रथम नाविन्यपूर्ण उत्पादन

स्पर्धात्मक किंमती आणि पारदर्शक व लवचिक खरेदीद्वारे अक्षय ऊर्जेच्या खरेदीदारांना जीटीएएम लाभ देईल – श्री आर के सिंह

भारतभर बाजारपेठेत प्रवेश मिळून विक्रेत्यांनाही होणार फायदा

Posted On: 01 SEP 2020 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020 


भारतीय अल्पावधी ऊर्जा बाजारपेठेला हरित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून, ऊर्जा आणि नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जामंत्री (स्वतंत्र अधिभार) आणि राज्यमंत्री (कौशल्य विकास आणि उद्योजकता) श्री आर. के. सिंह, यांनी ऊर्जा क्षेत्रात भारतभर ग्रीन टर्म अहेड मार्केट (डीटीएएम) योजनेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज, 1 सप्टेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे प्रारंभ केला.

उपक्रमाचा प्रारंभ झाल्यानंतर बोलताना श्री सिंग म्हणाले, "जीटीएएम प्लॅटफॉर्मचा परिचय अक्षय ऊर्जा समृद्ध राज्यांवरील ताण कमी करेल आणि त्यांच्या स्वतःच्या नूतनीकरणयोग्य खरेदीच्या बंधनापलिकडे (रिन्युएबल पर्चेस ऑब्लिगेशन - आरपीओ) अक्षय ऊर्जा क्षमता विकसित करण्यास प्रोत्साहित करेल. त्यामुळे अक्षय ऊर्जा व्यापारी क्षमता वाढण्यास मदत होईल आणि देशातील अक्षय ऊर्जा क्षमता वाढीची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल." त्यांनी पुढे नमूद केले की, डीटीएएम व्यासपीठ हे अक्षय ऊर्जा क्षेत्रात येणाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी मदत होईल. स्पर्धात्मक किंमती आणि पारदर्शक व लवचिक खरेदीद्वारे अक्षय ऊर्जेच्या खरेदीदारांना जीटीएएम लाभ देईल. यामुळे भारतभर मार्केटमध्ये प्रवेश मिळवून अक्षय ऊर्जा विक्रेत्यांनाही फायदा होईल.

भारत सरकारने 2022 पर्यंत 175 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य गाठण्यासाठी देशभरात पुनर्नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. ग्रीन टर्म अहेड मार्केट करारामुळे अक्षय ऊर्जा व्युत्पन्न करण्यासाठी नूतनीकरणयोग्य ऊर्जेच्या विक्रीसाठी अतिरिक्त मार्ग मिळू शकेल. नूतनीकरण करणाऱ्या संस्थांना त्यांचे नूतनीकरणयोग्य खरेदीचे दायित्व पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक किंमतींवर नूतनीकरणयोग्य शक्ती मिळविण्यासाठी सक्षम करता येईल, आणि हरित ऊर्जा विकत घेण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या जागरूक असलेल्या ग्राहक आणि सोयी – सुविधा यांना एक व्यासपीठ प्रदान करेल.

जीटीएएमची वैशिष्ट्ये –

  1. जीटीएएमद्वारे व्यवहार हे द्विपक्षीय स्वरूपाचे असतील, जे संबंधित खरेदीदार आणि विक्रेत्यांची स्पष्ट ओळख असतील, आरपीओसाठी हिशेबाच्या कामात कोणतीही अडचणी येणार नाही.  
  2. जीटीएएम करार सौर आरपीओ आणि सौर नसलेले आरपीओमध्ये विभागले जातील, कारण आरपीओ लक्ष्य देखील विभागण्यात आले आहे.
  3. पुढे दोन विभागांमध्ये जीटीएएम करारामध्ये ग्रीन इंट्राडे आणि डे अहेड कॉन्टिन्जन्सी, दैनंदिन आणि साप्ताहिक करार असतील.
    1. दैनंदिन आणि साप्ताहिक करार आणि डे अहेड कॉन्टिन्जन्सी कॉन्ट्र्क्ट – 15 मिनिटांच्या ब्लॉक निहाय मेगावॉट आधारावर लिलाव होईल.
    2. दैनंदिन आणि साप्ताहिक करार – मेगावॅट आधारावर लिलाव होईल. दोन्ही खरेदीदार आणि विक्रेता त्यांची बोली सादर करू शकतात. तथापि, विक्रेता (रुपये / एमडब्ल्यूएच) सब 15 मिनिटांच्या वेळेनुसार प्रमाण (मेगावॅट) च्या संदर्भात प्रोफाइल सादर करेल. कराराची अंमलबजावणी झाल्यानंतर वेळापत्रकानुसार नियोजन केले जाईल. एकाधिक खरेदीदारांच्या बाबतीत, प्रो–राटा तत्वावर प्रोफाइल वाटप केले जाइल.
  4. किंमत शोध निरंतर आधारावर म्हणजेच किंमत वेळ प्राधान्य तत्त्वावर होईल. त्यानंतर बाजाराची स्थिती पाहता दररोज व साप्ताहिक करारासाठी खुला लिलाव सादर केला जाऊ शकतो.
  5. जीटीएएम कराराद्वारे अनुसूची केलेली ऊर्जा ही खरेदीदाराची अभिमत पुनऀनवीकरणीय खरेदी दायित्व(आरपीओ) मानले जाईल.

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनीही नूतनीकरणक्षम ऊर्जेला चालना देण्यासाठी ऊर्जा बाजारात आणली जाण्याची इतर उत्पादने नियोजनात असल्याचे नमूद केले.

 

* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1650496) Visitor Counter : 288