केंद्रीय लोकसेवा आयोग
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) 2019- अंतिम निकाल जाहीर
Posted On:
01 SEP 2020 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020
केंद्रीय लोक सेवा आयोगाने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II)2019 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या निकालानुसार पात्र ठरलेल्या 196 (106+76+14) उमेदवारांची गुणवत्तेनुसार सूची देण्यात आली आहे. या उमेदवारांच्या संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाच्यावतीने मुलाखती घेण्यात आल्या होत्या. आता या पात्र उमेदवारांना देहराडूनच्या भारतीय लष्करी अकादमी, एझीमलाच्या भारतीय नाविक अकादमी आणि हैद्राबादचया भारतीय हवाई दल अकादमी या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उमेदवारांचा अभ्यासक्रम क्रमांक 208 एफ (पी) असणार आहे.
वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी तीन सूचींमध्ये काही समान उमेदवार आहेत. भारतीय लष्करी अकादमीसाठी सरकारच्यावतीने सूचित करण्यात आलेल्या रिक्त जागा 100 आहेत, (यामध्ये एन.सी.सी.च्या सी प्रमाणपत्र धारकांसाठी 13 जागांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.) भारतीय नौसेना अकादमी एझीमला, केरळ, कार्यकारी (सामान्य सेवेसाठी) 45 जागा (यामध्ये एन.सी.सी.च्या सी प्रमाणपत्र धारकांसाठी 6 जागांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.) तसेच हवाई दल अकादमी, हैद्राबादसाठी 32 (यामध्ये एन.सी.सी.च्या सी प्रमाणपत्र धारकांसाठी 3 जागांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.) जागा आहेत.
लोक सेवा आयोगाने भारतीय लष्कर अकादमी, भारतीय नाविक अकादमी तसेच हवाई दल अकादमी यांच्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी अनुक्रमे 2699, 1592 आणि 611 उमेदवारांनी लिखित परीक्षा दिली होती. अंतिम निकालानुसार सेना मुख्यालयाच्यावतीने सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारे निकाल घोषित करण्यात आला आहे. या सूची तयार करताना आरोग्य, तंदुरूस्तीच्या परीक्षेतल्या गुणांचा विचार करण्यात आलेला नाही. सेना मुख्यालयाच्यावतीने या उमेदवारांच्या जन्मतारखा तसेच शैक्षणिक योग्यता यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा निकाल अंतरिम मानण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या जन्मतारखेची नोंद असलेले प्रमाणित दस्तऐवज तसेच शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करीत असल्यासंबंधीची प्रमाणपत्रे यांच्या मूळ प्रति तसेच अनुप्रमाणित छायाप्रति सादर करावेत. आपण ज्या लष्करी शाखेला पहिली पसंती दिली आहे, त्यानुसार त्या त्या सेना मुख्यालयांना आपल्या प्रमाणपत्रांच्या प्रती पाठवून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांच्या निवासी पत्यामध्ये काही बदल झाला असेल तर त्याची माहिती सेना मुख्यालय, नौसेना मुख्यालय अथवा वायू सेना मुख्यालयाला कळविण्यात यावी.
या परीक्षांचा निकाल केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या संकेतस्थळावर http://www.upsc.gov.in. उपलब्ध आहे. सर्व उमेदवारांचे गुण अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्यावतीने अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत. कोणत्याही अतिरिक्त सूचनांसाटी उमेदवारांनी केंद्रीय लोक सेवा आयोग कार्यालय, गेट ‘सी’च्या जवळ असलेल्या कौउंटरवर कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिनी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत वैयक्तिक रूपात अथवा दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधावा. यासाठी दूरध्वनी क्रमांक - 011.23385271/ 011.23381125/ 011.23098543
अंतिम निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650485)