भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाने प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

Posted On: 31 AUG 2020 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

 

भारतीय निवडणूक आयोगाने माजी राष्ट्रपती प्रणव  मुखर्जी यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले, त्यांच्या निधनाने, देशाने सर्वदूर सन्मान प्राप्त असलेला, आर्थिक, घटनात्मक आणि ऐतिहासिक बाबींचे ज्ञान असलेला राजर्षी गमावला आहे.  प्रणव मुखर्जी यांच्या निवडणूक आयोगासोबतच्या खास संबंधांची आठवण करताना, अरोरा म्हणाले, प्रकृती ठीक नसतानाही प्रणव  मुखर्जी यांनी अतिशय नम्रतेने 23 जानेवारी 2020 रोजी पहिल्या सुकुमार सेन स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यानाचे आमंत्रण स्वीकारले होते. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी 2016 आणि 2017 मध्ये निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय मतदान दिनाला संबोधित केले होते. 

ईश्वर त्याच्या कुटुंबाला शक्ती देवो, असे अरोरा आपल्या संदेशात पुढे म्हणाले.

 

M.Chopade /S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1650145) Visitor Counter : 188