अर्थ मंत्रालय

भारतातील कोविड-19 संकटाचा मुकाबला करण्यासाठी जपान आरोग्य क्षेत्राला 3,500 कोटी रुपये (सुमारे) विकास सहाय्य करणार

Posted On: 31 AUG 2020 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

जपान सरकारने कोविड-19 संकटासाठी तातडीची मदत म्हणून सुमारे 3,500 कोटी रुपये (जेपीवाय 50 बिलियन) देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील  दस्ताऐवजांचे आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ सी.एस. मोहपात्रा आणि जपानचे राजदूत सुझूकी सातोषी यांच्यात आदानप्रदान करण्यात आले. 

या कर्जातून भारतातील कोविड-19 विरोधातील लढाईला पाठबळ मिळणार आहे आणि भविष्यातील संक्रमण परिस्थितीचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच यातून संसर्गजन्य रोगांविरूद्धच्या भारताच्या आरोग्य यंत्रणेला मजबूती प्रदान करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, जपान सरकारकडून मदत (ग्रँट असिस्टन्स) म्हणून 70 कोटी रुपये  (जेपीवाय 1 बिलिअन) मिळणार आहेत, यासंदर्भातही दस्ताऐवजांचे आदानप्रदान करण्यात आले. 

जपान सरकारचे अनुदान भारतातील सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय व्यवस्था मजबूत करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी आहे. यातून कोविड-19 च्या गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांसाठी आरोग्य सुविधा व्यवस्थापन मजबूत केले जाणार आहे.

भारत आणि जपान द्विपक्षीय विकास सहकार्याचा प्रदीर्घ आणि फलदायी इतिहास 1958 पासून आहे.

 

 

M.Chopade /S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650131) Visitor Counter : 232