रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एनएचआयने 2020-21 आर्थिक वर्षात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक लांबीच्या प्रकल्पांचे कंत्राट बहाल केले
31,000 कोटी रुपयांचे 744 किलोमीटर लांबीचे 26 प्रकल्प एप्रिल-ऑगस्ट 2020 मध्ये बहाल
Posted On:
31 AUG 2020 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
कोविड संक्रमणाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) 2020-21 आर्थिक वर्षात, गेल्या तीन वर्षात बहाल केलेल्या प्रकल्पांशी तुलना करता सर्वाधिक लांबीचे रस्ते प्रकल्प बहाल केले आहेत. एनएचआयने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान, एनएचआयने 744 किलोमीटर लांबीचे 26 प्रकल्प बहाल केले आहेत. 676 किलोमीटर लांबीचे प्रकल्प 2019-20 आर्थिक वर्षात, 368 किलोमीटर लांबीचे प्रकल्प 2018-19 आर्थिक वर्षात आणि 504 किलोमीटर लांबीचे प्रकल्प 2017-18 मध्ये बहाल केले होते. 26 प्रकल्पांचा भांडवली खर्च 31,000 कोटी रुपये आहे. यात बांधकाम, भूसंपादन आणि इतर बांधकाम-पूर्व खर्चाचा समावेश आहे.
एनएचआयने चालू आर्थिक वर्षात 4500 किलोमीटर महामार्गाचे कंत्राट बहाल करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
टाळेबंदीतही या क्षेत्रातील निविदाकारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी एनएचआयने अनेक उपक्रम हाती घेतले. कंत्राटदारांना भांडवल तुटवडा होऊ नये आणि रक्कम व्यवस्थित प्रदान करण्यासाठी कार्यालय बंद असतानाही मार्च महिन्यात टाळेबंदी असतानाही डिजीटल माध्यमांतून 10,000 कोटी रुपये वितरीत केले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एनएचआयने पुरवठादारांना 15,000 कोटी रुपये प्रदान केले. याव्यतिरिक्त, कंत्राटदारांना मासिक पगार दिला. या उपाययोजनांमुळे निविदाकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि रस्ते क्षेत्राच्या वाढीवर सकारात्मक परिणाम झाला.
संक्रमणाचे जागतिक संकट असतानाही रस्ते बहाल करण्याचे आणि महामार्ग निर्मितीचा विस्तार वाढला आहे. राष्ट्रीय महामार्ग सुविधांचा वेगाने विकास करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित, सुलभ आणि अखंड प्रवास अनुभव प्रदान करण्यास एनएचएआय कटीबद्ध आहे.
M.Chopade /S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650118)