सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी मास्कची लोकप्रियता वाढली; केव्हीआयसीला रेडक्रॉस सोसायटीकडून 10.5 लाख फेस मास्कसाठी पुन्हा ऑर्डर मिळाली

Posted On: 31 AUG 2020 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

 

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (केव्हीआयसी) भारतीय रेडक्रॉस सोसायटीकडून (आयआरसीएस) 10.5 लाख उच्च दर्जाच्या  फेस मास्कचा  पुरवठा करण्याबाबत पुन्हा ऑर्डर मिळाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. नवीन खरेदीची ऑर्डर यापूर्वीच्या 1.80 लाख फेस मास्कसाठी मिळालेल्या ऑर्डरनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मिळाली आहे , त्यापैकी केव्हीआयसीने  सोसायटीला यापूर्वीच 1.60 लाख फेस मास्क पुरवले आहेत.

3.30 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर नुकतीच प्राप्त झाली आहे आणि या आठवड्यातच पुरवठा सुरू होईल. केव्हीआयसी दोन दिवसात पहिल्या ऑर्डरचा उर्वरित पुरवठा पूर्ण करेल. पहिल्या ऑर्डरनुसार पुरवलेल्या फेस मास्कप्रमाणेच दुसऱ्या ऑर्डरमधील मास्क असतील. केव्हीआयसीकडून उत्कृष्ट दर्जा आणि वेळेवर मास्क पुरवण्यात आल्यामुळे आयआरसीएसकडून पुन्हा ऑर्डर मिळाली आहे.

केंद्रीय एमएसएमई मंत्री  नितीन गडकरी यांनी मास्क बनवण्याच्या उपक्रमांच्या माध्यमातून देशात शाश्वत रोजगार निर्मिती केल्याबद्दल केव्हीआयसीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की फेस मास्क हे कोरोना रोगाविरूद्ध सर्वात प्रभावी संरक्षणात्मक साधन बनले आहे; त्याच्या उत्पादनामुळे कारागिरांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे .

स्थानिक निर्मितीला ही मोठी चालना आहे कारण यामुळे खादी कारागिरांसाठी जवळपास  50,000 अतिरिक्त मनुष्य दिवस रोजगार तयार होतील. या ऑर्डरच्या अंमलबजावणीसाठी हाती तयार केलेल्या सुती खादीचे 1 लाख मीटरपेक्षा जास्त कापड लागेल जे  वेगवेगळ्या राज्यांमधून विविध खादी संस्थांकडून पुरवले जाईल. यामुळे  सूतकताई आणि विणकामाला गती मिळेल आणि अशा प्रकारे कारागिरांसाठी रोजगार उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे, केव्हीआयसीला  आतापर्यंत प्राप्त झालेल्या खादी फेस मास्कच्या पुरवठ्याची ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. इतर खादी फेस मास्क प्रमाणेच आयआरसीएससाठी बनविलेले मास्क देखील धुण्यायोग्य, पुन्हा वापरण्यायोग्य, त्वचेला -अनुकूल आणि जैव विघटन करता येतील असे आहेत.

 

M.Chopade /S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650075) Visitor Counter : 213