आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य मंत्रालय उत्तर प्रदेश, झारखंड,छत्तीसगड आणि ओदिशामध्ये केंद्रीय पथके पाठवणार


प्रतिबंध, देखरेख,चाचण्या आणि प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन बळकट करण्यासाठी केंद्रीय पथके सहाय्य करणार

Posted On: 31 AUG 2020 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

 

उत्तर प्रदेश, झारखंड,छत्तीसगड आणि ओदिशामध्ये उच्च स्तरीय  केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतला आहे. या राज्यात कोविड रुग्णात अचानक मोठी वाढ झाली असून यापैकी  काही राज्यात मृत्यू दरातही वाढ झाली आहे.

प्रतिबंध, देखरेख,चाचण्या आणि रुग्णासंदर्भात  प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन बळकट करण्यासाठी केंद्रीय पथके राज्यांना सहाय्य करणार आहेत. वेळेवर निदान आणि पाठपुरावा याच्याशी संबंधित आव्हानांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठीही ही पथके राज्यांना मार्गदर्शन करतील.

या बहु क्षेत्रीय प्रत्येक पथकात साथरोग तज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ञ यांचा समवेश राहील.

या चार राज्यांपैकी उत्तर प्रदेशात सर्वात जास्त म्हणजे 54,666 सक्रीय रुग्ण आढळले आहेत,  त्यानंतर ओदिशा (27,219), छत्तीसगड (13,520)आणि झारखंड मध्ये 11,577 सक्रीय रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या उत्तर प्रदेशात 2,25,632, ओदिशा(1,00,934), झारखंड  (38,435) आणि छत्तीसगडमध्ये  30,092 आहे. उत्तर प्रदेशात (3423) तर ओदिशा, झारखंड  आणि छत्तीसगडमध्ये  अनुक्रमे 482, 410 and 269 मृत्यूंची नोंद झाली आहे.

विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या आव्हानाविषयी जाणून घेऊन काही अडचणी असल्यास त्या दूर करण्यासाठी आणि कोविड-19 विरोधातले प्रयत्न बळकट करण्यासाठी, केंद्र सरकारया अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी वेळोवेळी केंद्रीय पथके नियुक्त करत आहे.

 

M.Chopade /N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650064) Visitor Counter : 180