श्रम आणि रोजगार मंत्रालय

औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-आयडब्ल्यू ) जुलै-2020

Posted On: 31 AUG 2020 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न श्रम ब्युरो हे कार्यालय दर महिन्याला औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक जारी करते. देशातल्या 78 औद्योगिक महत्वाच्या केंद्रातल्या 289 बाजारपेठातून निवडक वस्तूंच्या किरकोळ किमतीवर आधारित हा निर्देशांक जारी करण्यात येतो. 78 केंद्रातून हा निर्देशांक संकलित करण्यात येतो आणि महिन्याच्या कार्यालयीन कामकाजाच्या अखेरच्या दिवशी जारी केला जातो. जुलै 2020 या महिन्यासाठीचा निर्देशांक या प्रसिद्धी पत्रकात जारी करण्यात आला आहे. 

जुलै 2020 महिन्यासाठीच्या,अखिल भारतीय सीपीआय-आय डब्ल्यूमध्ये 4 अंकांची वाढ होऊन तो 336 झाला आहे. 1 महिन्याच्या टक्केवारी बदलाच्या दृष्टीने त्यात जून आणि जुलै 2020 मध्ये याधीच्या वर्षातल्या(+) 0.95  याच काळाच्या तुलनेत यावर्षीच्या याच  काळात  (+) 1.20  टक्के वाढ झाली आहे.

सध्याच्या निर्देशांकात मोठा ऊर्ध्वगामी दबाव गृहनिर्माण गटाकडून (+) 2.28  आला आहे. खाद्यान्न निर्देशांकाने सर्वसाधारण निर्देशांकाला  (+) 1.77 टक्के अंकांनी योगदान दिले आहे. गहू पीठ, मोहरी तेल, म्हशीचे दुध, हिरवी मिरची, वांगी,पालक, पडवळ,बटाटे, टोमटो,स्वयंपाकाचा गॅस, बस भाडे,पेट्रोल, शिलाई यामुळेही निर्देशांकात वाढ झाली. मात्र तांदूळ, ताजे मासे, बकऱ्याचे मांस, चिकन, यासारख्या वस्तूमुळे उंचावणाऱ्या निर्देशांकाला रोखले आणि त्याचा आलेख खाली आणला.

सर्व वस्तूंवर आधारित गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई जुलै 2020 मध्ये 5.33 टक्के राहिली, याधीच्या महिन्याच्या 5.06 टक्के तुलनेत हा दर आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात हा दर 5.98 टक्के होता. खाद्यान्न चलनवाढ 6.38 टक्के राहिली, गेल्या वर्षीच्या याच महिन्यात हा दर 4.78टक्के होता.

जुलै 2020 महिन्यासाठीच्या,अखिल भारतीय सीपीआय-आय डब्ल्यू  बद्दल बोलताना केंद्रीय  श्रम आणि रोजगार राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितले, की सीपीआय-आय डब्ल्यू  मध्ये वाढ झाल्याने संघटीत क्षेत्रातल्या औद्योगिक कामगारांच्या तसेच सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या  मजुरी/वेतनावर सकारात्मक परिणाम होईल.घर भाडे आणि बटाटे, टोमटो,औषधे, बस भाडे, पेट्रोल यांचे दर वाढल्याने वार्षिक महागाई दरात वाढ झाल्याचे  त्यांनी सांगितले.

लेबर ब्युरोचे महासंचालक डीपीएस नेगी यांनी सीपीआय-आय डब्ल्यू  मध्ये वाढ झाल्याने संघटीत क्षेत्रातल्या औद्योगिक कामगारांच्या तसेच सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या  मजुरी/वेतनावर सकारात्मक परिणाम होईल असे हा निर्देशांक जारी करताना  सांगितले. कोविड-19 मुळे किमत विषयक आकडेवारी जमा करताना अनेक मर्यादा येऊनही लेबर ब्युरोने कोणताही अडथळा येऊ न देता नियोजित वेळीच मासिक निर्देशांक जारी केल्याचे त्यांनी सांगितले. निर्देशांकात वाढ प्रामुख्याने गृहनिर्माण आणि खाद्यान्न गटातल्या वस्तूंमुळे झाली आहे. गृहनिर्माण निर्देशांक दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारित करण्यात येतो. खाद्यान्न गटात बटाटे आणि  टोमटो, वाढीसाठी कारणीभूत ठरले. याशिवाय स्वयंपाकाचा गॅस, आणि पेट्रोल  या इंधनाच्या किमतीतही वाढ झाली.

 

M.Chopade /N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1650028) Visitor Counter : 276