विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

धातूच्या पृष्ठभागाच्या स्वयं-स्वच्छतेची लेसर आधारित वन स्टेप प्रक्रिया गंज रोखण्यास मदत करेल

Posted On: 31 AUG 2020 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

 

जैव वैद्यकीय आणि इतर अनुप्रयोगांना गंजण्यापासून आणि जीवाणूंच्या वाढीपासून वाचवू शकणारी अल्ट्राफास्ट लेसर-आधारित पृष्ठभाग स्वतः साफ करणारी पर्यावरण पूरक प्रक्रिया लवकरच अस्तित्वात येऊ शकते; वैज्ञानिकांनी कोणताही लेप किंवा पृष्ठभागावर कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया न करता हे विकसित केले आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) स्वायत्त संस्था असणाऱ्या ॲडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटालर्जी अँड न्यू मटेरियल (एआरसीआय) केंद्रातील वैज्ञानिकांनी त्यांच्या सामग्री लेझर प्रक्रिया केंद्रात पाणी प्रतिकर्षित करण्याची क्षमता असलेला सुपर-हायड्रोफोबिक फंक्शनल पृष्ठभाग विकसित करण्यासाठी एक-चरण पद्धत आणली आहे. अशा पृष्ठभागांमुळे बाष्पीभवन होईपर्यंत पाणी तिथे चिकटून राहत नाही.

प्रकाशन लिंक : https://doi.org/10.1520/MPC20180090

अधिक माहितीसाठी डॉ. रवी एन बाथे यांना  (ravi@arci.res.in) वर संपर्क साधा

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649984) Visitor Counter : 142