पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षणमंत्री आर पी निशांक यांच्या हस्ते ओदिशा केंद्रीय विद्यापीठात नवीन सुविधांचा पायाभरणी सोहळा

Posted On: 29 AUG 2020 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्‍ट 2020


पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू आणि स्टील खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान, आणि शिक्षणमंत्री आर पी निशांक यांच्या हस्ते कोरपूत येथील ओदिशा केंद्रीय विद्यापीठात शैक्षणिक ब्लॉक, ग्रंथालय आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था या सुविधांचा पायाभरणी सोहळा पार पडला. 

धर्मेंद्र प्रधान यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि आनंद व्यक्त केला की, ओदिशा केंद्रीय विद्यापीठ उच्च शिक्षणासाठीचे राज्यातील प्रमुख केंद्र ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये उच्च शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, आयआयएम, आयआयटी, आयआयएसईआर, सीआयपीईटी, एनआयएसईआर, आयसीटी-आयओसीएल या प्रमुख संस्थांची ओदिशात स्थापना करण्यात आली. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी बोलताना प्रधान म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे मुलभूत औद्योगिक-शैक्षणिक-सरकार भागीदारी निर्माण होईल आणि प्रदेशांचा सर्वांगीण विकास होईल. कोरपूत हा आदिवासी विविधतेने संपन्न आहे आणि एनईपी 2020 मध्ये विस्तृत-आधारीत आणि सर्जनशील अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, यामुळे वंचित विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी निर्माण होतील आणि ओदिशातील आदिवासी आणि मानववंशास्त्र संशोधन-आधारीत अभ्यासाला चालना मिळेल. 

धर्मेंद्र प्रधान यांनी ओदिशा केंद्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना नवकल्पना प्रकल्प, लाभदायक कृषी संशोधन आणि उद्योजकतेसाठीचे प्रकल्प हाती घेण्यास सांगितले. यामुळे कोरपूरतच्या कोरपूत आले यासारख्या सेंद्रीय कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळेल. ओदिशा केंद्रीय विद्यापीठ राज्याला आणि देशाला ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाईल. 

याप्रसंगी बोलताना आर पी निशांक म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संस्थेची उद्दीष्टे व प्रक्रिया यांच्या अनुषंगाने केलेली प्रगती पाहून मला आनंद वाटतो. मला विश्वास आहे की. मुख्य विज्ञान आणि नवीन सामाजिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू केल्याने ओदिशाच्या विद्यमान विद्याशाखांमध्ये आणखी गुणवत्तेचे आयाम जोडले जातील. 


* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1649634) Visitor Counter : 126