विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डॉ हर्ष वर्धन यांनी एसटीआयपी 2020 तयार करण्यात लोकसहभागाचे केले आवाहन


‘इन कन्व्हर्सेशन विथ' - एसटीआयपी 2020 संदर्भात देशभरातील विचारवंतांशी विशेष संवादाची मालिका

“मायगव्ह पोर्टल” वर “एसटीआयपी 2020 पेज” तसेच “शालेय मुलांसाठी लोकप्रिय प्रश्नमंजुषा” देखील सुरू केले

“प्रस्तावित एसटीआय धोरण कोट्यवधी तरुण भारतीय वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यात सक्षम असावे”- डॉ. हर्षवर्धन

Posted On: 28 AUG 2020 11:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्‍ट 2020

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भू विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज देश आणि विदेशातील प्रामुख्याने हितधारक आणि लोकांना पुरावा-आधारित, समावेशक 'विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण  धोरण (एसटीआयपी 2020)'  तयार करण्यात  सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.  ते म्हणाले की हे तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण होऊन पारंपारिक संशोधन आणि  विकासासह  मुख्य प्रवाहातील आत्मनिर्भर पारंपारिक ज्ञान प्रणाली बनू  शकेल, तसेच  उद्योग-शैक्षणिक क्षेत्र, सरकारी आंतरजोडणी बळकट होईल, आणि समानतेला चालना देईल.

एसटीआयपी 2020 बाबत देशभरातील विचारवंतांसह  आणि भारतीय समुदायासह  विशेष संवाद साधणाऱ्या 'इन कन्वरसेशन विथ ' मालिकेच्या  उद्घाटन प्रसंगी डॉ. हर्ष वर्धन बोलत होते. त्यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी येथे एका व्हर्च्युअल कार्यक्रमात ‘शालेय मुलांसाठी लोकप्रिय प्रश्नमंजुषा ’ आणि  ‘मायगव्ह पोर्टलवर एसटीआयपी 2020 ’पेज देखील  सुरू केले.

आपल्या भाषणात डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, अलिकडच्या काळात संपूर्ण एसटीआय परिसंस्थेत  प्रासंगिकता, व्याप्ती आणि प्रमाण या दृष्टीने वेगवान बदल घडून आले आहेत. देशासाठी दीर्घ विकासाचा मार्ग आणि दृष्टी विकसित करण्यासाठी धोरणात याचा समावेश असायला हवा.  शिवाय, कोविड -19 ने काही नवीन शिक्षण पद्धती समोर आल्या  आणि एसटीआय प्रणालीला नवीन आयाम दिले असेही ते म्हणाले.

“आत्मनिर्भर भारत” साध्य करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तळागाळाच्या स्तरावर नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहित करावे लागेल, असेही ते म्हणाले. “चाकोरीबाहेरच्या आणि परिणामकारक तंत्रज्ञानाचा उदय झाला आहे आणि देशाने याचा फायदा करून घेतला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. ”

डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की, “प्रस्तावित एसटीआय धोरण प्रक्रिया चालू झाली आहे  एसटीआय प्रणालीने अलिकडच्या वर्षांत पाहिलेल्या आश्चर्यकारक प्रगतीचा हि प्रक्रिया लाभ घेईल  तसेच  लाखो तरुण  भारतीय शास्त्रज्ञांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम असा दीर्घकालीन मार्ग निर्माण करेल.  पण हे तेव्हांच  शक्य होईल ,जेव्हा आपण पूर्णपणे  समावेशक आणि सहभाग असलेले धोरण आखू तेव्हाच हे शक्य होईल असे ते म्हणाले.

धोरण आखणी प्रक्रिया स्पष्ट करताना ते  म्हणाले की एसटीआयपी -2020  प्रक्रियेला 4 परस्पर कृतींमध्ये विभागले आहे.  ट्रॅक -1 मध्ये 6 उपक्रमांसह विस्तारित सार्वजनिक आणि तज्ञांचा सल्ला समाविष्ट आहे ज्यायोगे देशाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला धोरणासाठी त्याच्या कल्पना, सूचना किंवा  टिप्पण्या पाठवता येतील.  ट्रॅक- II कृती तज्ञांच्या सल्ल्याशी संबंधित आहे, ट्रॅक- II ही मंत्रालये आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करण्यासाठी आहे आणि ट्रॅक --IV मध्ये सर्वोच्च  स्तरावरील विचारविनिमय आणि सल्ला यांचा समावेश आहे. ”

डीएसटीचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी अधोरेखित केले कि , “भारत आणि जग कोविड -19  च्या सध्याच्या परिस्थितीत नव्याने बदल आखत असताना या महत्वपूर्ण वळणावर एसटीआयपी 2020 हे  महत्त्वपूर्ण धोरण आखले जात आहे.” “आखणी प्रक्रियेचि संकल्पना सर्वसमावेशक आणि सहभागी मॉडेलची आहे”, असे ते  म्हणाले.

 नंतर डीएसटीचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी प्रास्तविक केलेल्या चर्चेत डॉ. हर्ष वर्धन यांनी एसटीआय परिसंस्था आणि एसटीआय धोरण संबंधित मुद्द्यांवर अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.  सहभागींनी देखील थेट वेबेक्स प्लॅटफॉर्मद्वारे प्रश्न विचारले. त्यांनी डॉ. हर्षवर्धन आणि इतर   तज्ञांकडून नाविन्यपूर्ण सूचना घेतल्या. या चर्चेतून समोर आलेल्या सूचना एसटीआयपी 2020 धोरण प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरतील.

 

Hyper Links;

  1. Background Note on STIP-2020
  2. Introduction to Formulation Process
  3. Journey of Last Six Years--Ministry of Science & Technology, and Earth Sciences

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649482) Visitor Counter : 206