ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून पोषण महिना साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2020 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाने आयोजित केलेला ‘पोषण माह’ साजरा करण्यासंदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारतीय अन्नधान्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सीडब्ल्युसी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिन्याचे आयोजन केले जाते. यात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आपल्या विविध संस्थांमार्फत लक्ष्यित गटांना समोर ठेवून पोषण सुरक्षेसंदर्भात केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने सुचवलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभर करण्याचा निर्णय घेतला आहे.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1649358)
आगंतुक पटल : 224