भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाकडून अशोक लवासा यांना निरोप


आयोगाकडून महत्त्वपूर्ण निवाड्यांच्या संकलनाचा VI वा भाग प्रसिद्ध

Posted On: 28 AUG 2020 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020

 

भारतीय निवडणूक आयोगाने आज अशोक लवासा यांना निरोप दिला, लवासा यांची आशियाई विकास बँक, मनिला, फिलीपाईन्स येथे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक लवासा यांनी जानेवारी 2018 मध्ये 23 वे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता आणि 31 ऑगस्ट 2020 पर्यंत ते कार्यरत होते.

त्यांच्या निरोप सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पुढील मोठी आव्हाने आणि मैलाचे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, हे निवडणूक आयोगाचे नुकसान आणि आशियाई विकास बँकेचा लाभ आहे, कोवीडनंतरच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थांची पुनर्रचना हे मोठे आव्हान पार पाडण्यासाठी लवासा यांची क्षमता बहुपक्षीय व्यासपीठावर उपलब्ध होईल.

याप्रसंगी बोलताना निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी आपल्य भाषणात अशोक लवासा यांच्या अर्थमंत्रालयातील कार्याचे कौतुक केले. कोविड परिस्थितीत निवडणुकांसाठी व्यापक नियमावली तयार करण्याकामी लवासा यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. 

अशोक लवासा म्हणाले, निवडणूक आयोगातील अडीच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ संस्मरणीय अनुभव आहे. निवडणूक आयोगात राहणे किंवा आशियाई विकास बँकेसारख्या जागतिक पटलावर जाणे यात निवड करणे नक्कीच अवघड होते, असे ते म्हणाले. 

निवडणूक आयोगाने आज सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी जानेवारी 2017 ते मे 2019, म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत  दिलेले महत्त्वपूर्ण निकाल, निकालांच्या संकलनाचा VI वा भाग प्रसिद्ध केला. याची ई-आवृत्ती https://eci.gov.in/ebooks/landmark-judgment/index.html सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली.

याविषयी सुनील अरोरा आपल्या संदेशात म्हणाले, मी अशी अपेक्षा करतो की, या प्रकाशनामुळे आपल्याला निवडणूक कायद्याच्या परिक्षेत्राबद्दल माहिती मिळेल आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाणीव करुन देईल की, त्यांच्या कार्याला न्यायपालिकेने नेहमीच अनुमोदन दिले आहे.

निवडणूक आयुक्त अशोक लवासा म्हणाले, या आवृत्तीमुळे आपल्या देशाच्या विस्तृत निवडणुकीविषयीच्या कायद्याच्या ज्ञानाची कक्षा रुंदावेल.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649316) Visitor Counter : 181