गृह मंत्रालय

पोलीस संशोधन आणि विकास ब्यूरो (बीपीआर अँड डी) चा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा


“संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून भारताची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यात बीपीआरडीची महत्त्वपूर्ण भूमिका ”-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Posted On: 28 AUG 2020 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020

पोलीस संशोधन आणि विकास ब्यूरो  (बीपीआर अँड डी) आज आपला सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त व्हर्च्युअल मोडमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीपीआर आणि डी ला सुवर्ण महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, गेल्या 50 वर्षात बीपीआर व डी देशाच्या सेवेत आपल्या वचनबद्धतेप्रति अटळ आहेत. आमचा भर आधुनिक, प्रभावी आणि संवेदनशील सुरक्षा व्यवस्थेवर  आहे जी समाजातील सर्व घटकांमध्ये सुरक्षिततेची भावना प्रेरित करते.  पंतप्रधान मोदी म्हणाले की, शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी कार्यक्षम साधन सुनिश्चित करण्यासाठी  प्रगत तंत्रज्ञानाबरोबर जाण्याची गरज  यापूर्वी कधीही इतकी भासली नव्हती.

पंतप्रधान म्हणाले, "तंत्रज्ञान आणि मानवी संसाधनांचा योग्य प्रकारे उपयोग करण्यासाठी अभिनवता आणि संशोधन यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नागरिक-केंद्री  आणि नागरिक-अनुकूल दृष्टिकोन बाळगून पोलिस दलाची व्याप्ती आणि क्षमता वाढवण्यासाठी कौशल्य, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांचे अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बीपीआर आणि डी च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या संदेशामध्ये अमित शहा म्हणाले की पोलिस संशोधन आणि  विकास ब्युरोच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा. संशोधन आणि विकासाद्वारे  भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यात बीपीआर आणि डी ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशातील भक्कम आणि आधुनिक पोलिस यंत्रणेसाठी कायम प्रयत्नशील असणाऱ्या बीपीआर आणि डी ला  मी  सलाम करतो.

आपल्या भाषणात केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, नवीन विचार आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि देशाच्या सुरक्षेसाठी पोलिस दलांना सक्षम बनवणे हा  एक नवीन आणि आत्मनिर्भर भारताचा महत्त्वपूर्ण पैलू आहे.

पोलिसांच्या समस्यांच्या वेगवान आणि  पद्धतशीर अभ्यासाला प्रोत्साहन, तसेच पोलिसांच्या पद्धती आणि तंत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या ठरावाद्वारे 28 ऑगस्ट  1970 रोजी पोलिस संशोधन आणि  विकास ब्युरोची स्थापना करण्यात आली.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649294) Visitor Counter : 231