गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या ऑनलाईन डॅश बोर्डचे उद्‌घाटन


माहितीची देवघेव आणि योजनेवर देखरेख ठेवण्यासाठीची समग्र व्यवस्था

या योजनेअंतर्गत 7.15 लाख पेक्षा अधिक अर्ज दाखल, 1.7लाख अर्जांना मंजुरी

Posted On: 28 AUG 2020 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020

पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर योजनेच्या (पीएम स्वनिधी) ऑनलाईन डॅश बोर्डचे आज, गृहनिर्माण आणि नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्‌घाटन झाले.

हा ऑनलाईन डॅश बोर्ड अत्यंत क्रियाशील, परस्पर माहितीस उपयुक्त असून या योजनेशी सबंधित सर्व घटकांना या डॅश बोर्डचा लाभ होणार आहे. शहराच्या पातळीवर पीएम स्वनिधी योजनेची माहिती मिळवणे आणि या योजनेच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी या डॅश बोर्डचा उपयोग होईल.

या योजनेची सुरुवात झाल्यावर पीएम स्वनिधी पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी, 2 जुलै 2019 पासून  ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत, सुमारे 7.15 लाख आर्ज आले असून त्यातले 1.70 रुपये मंजूर करण्यात आले आहेत .

जून 1, 2020 रोजी या योजनेची घोषणा केली. कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे ज्यांचे रोजगार गेले आहेत अशा सर्व फेरीवाले विक्रेत्यांना त्यांचे जीवनमान सुरु करता यावे यासठी या योजनेअंतर्गत त्यांना वाजवी दरात भांडवल पुरवठा केला जाणार आहे . 50 लाखपेक्षा जास्त फेरीवाल्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. 24 मार्च 2020 पर्यंत किंवा त्याआधी फेरीवाले म्हणून काम करत असलेल्या शहरी अथवा निमशहरी भागातील कामगारांनाही त्याचा लाभ मिळेल.  या योजनेअंतर्गत, फेरीवाल्यांना 10,000 रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे, जे त्याना एका वर्षाच्या आत, दरमहा फेडावे लागेल. आणि त्यांनी वेळेत/वेळेआधी कर्ज फेडले तर त्याना व्याजदरावर वार्षिक 7 टक्के अनुदान मिळेल. त्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात. मुदतपूर्व कर्जफेडी वर काहीही दंड आकाराला जात नाही. या योजनेमुळे सर्वाना एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहे . तसेच या योजनेअंतर्गत, 100 रुपये कॅश-बॅक सारख्या आकर्षक उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.

योजनेचा निधी तिमाहीच्या  टप्प्यात अर्जदाराच्या खात्यात जमा केला जातो. लवकर/वेळेत कर्जफेड केल्यास, फेरीवाल्यांना आपला उद्योगधंदा वाढवण्यासाठी  अधिक कर्ज घेण्याचीही संधी उपलब्ध आहे.

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649259) Visitor Counter : 192