अर्थ मंत्रालय

जीएसटीच्या विलंबित देयकावर व्याज : सीबीआयसी

Posted On: 26 AUG 2020 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2020

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) आज स्पष्टीकरण दिले की जीएसटीच्या विलंब देयकावरील व्याजा संबंधित 25 ऑगस्ट 2020 रोजी जारी होणारी अधिसूचना क्रमांक 63/2020-केंद्रीय कर काही तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन जारी करण्यात आली आहे. तथापि, जीएसटी परिषदेच्या 39 व्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य कर प्रशासन मागील कालावधीसाठी कोणतीही वसुली करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार करदात्यांना संपूर्ण दिलासा मिळेल हे सुनिश्चित केले जाईल.

1 सप्टेंबर 2020 पासून निव्वळ दायित्वावर जीएसटी देण्यास उशीर झाल्यावर व्याज आकारण्याबाबत 25 ऑगस्ट 2020 रोजीच्या अधिसूचनेसंदर्भात सोशल मीडियावर येणाऱ्या टिप्पण्यांवर प्रतिसाद देताना सीबीआयसीने हे स्पष्टीकरण दिले आहे.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648853) Visitor Counter : 253