शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय बालभवनची आढावा बैठक घेतली


मुलांमध्ये सर्जक उपक्रम रुजवण्यासाठी राष्ट्रीय बालभवनने मुलांसाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार सुरु करावेत – रमेश पोखरियाल निशंक

प्रविष्टि तिथि: 25 AUG 2020 11:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राष्ट्रीय बाल भवन साठी आज नवी दिल्ली येथे  आढावा बैठक घेतली. या बैठकीला सचिव एस अनिता करवाल, सहसचिव शालेय शिक्षण आर.सी. मिणा आणि राष्ट्रीय बाल भवनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय बाल भवन उपक्रमांचा आढावा घेतला आणि सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय बालभवनच्या उपक्रमांना वेग आणण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. राष्ट्रीय बाल बाबांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या प्रगतीचा आहे त्यांनी आढावा घेतला त्याबरोबरच त्यांची सध्याचे सभासदतत्वाचे तपशील आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचाही  आढावा घेतला.

मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांसाठी वेबिनार मार्फत  सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जेणेकरून आपल्या देशातील विविधरंगी संस्कृतीशी ते परिचित होऊ शकतील.  पोखरियाल यांनी अधिकाऱ्यांना बाल भवन उपक्रमांना आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा प्रकारे चालना देऊ शकू  याचीही शक्यता आजमावयास  सांगितले

राष्ट्रीय बाल भवन हे आपल्या विद्यार्थ्यांना विविध सर्जक उपक्रम शिकण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. स्थानीय केंद्रात आपण हे उपक्रम वाढवले पाहिजेत जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना या व्यासपीठाचा फायदा होईल असे  निशंक यांनी सांगितले. मुलांमध्ये सर्जक उपक्रम रुजवण्यासाठी राष्ट्रीय बालभवनने मुलांसाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार सुरु करावेत अशी सूचना करत त्यांनी अधिकाऱ्यांना त्या दृष्टीने योजना तयार करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय बाल भवन मधील रिक्त जागांचा ही शिक्षणमंत्र्यांनी आढावा घेतला आणि या रिक्त जागा भरण्यासाठीच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या

 

B.Gokhale /V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1648640) आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Tamil , Telugu