कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे नागरी सेवा परीक्षा 2019 च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
Posted On:
25 AUG 2020 10:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020
केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणु उर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज आयएएस /नागरी सेवा परीक्षा 2019 मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. अखिल भारतीय स्तरावरील तीन अव्वल क्रमांक प्राप्त विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

संवाद साधताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात (डीओपीटी) नॉर्थ ब्लॉक येथील डीओपीटी मुख्यालयात अखिल भारतीय स्तरावरील अव्वल क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित करण्याची आणि प्रशस्तिपत्रे प्रदान करून त्यांचा सत्कार करण्याची एक नवीन परंपरा सुरू केली. कोविड -19 मुळे यंदाचा सोहळा तशा स्वरुपात आयोजित होऊ शकला नाही.

या विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पां दरम्यान डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या कुटूंबाविषयी आणि त्यांच्या भविष्यातील आकांक्षा बाबत विचारपूस केली. ते म्हणाले, स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम काळात ते या सेवांमध्ये प्रवेश करत आहेत, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अग्रेसर असून लवकरच जगातील आघाडीचे राष्ट्र बनेल . त्या दृष्टिकोनातून ते म्हणाले की, ज्या तरुण अधिकाऱ्यांना 30 ते 35 वर्षे सेवा बजावायची आहे, त्यांना मोदींच्या नवभारत निर्मितीत हातभार लावण्याचे भाग्य मिळेल.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी गेल्या सहा वर्षांत युवा प्रशिक्षणार्थी आणि आयएएस अधिका-यांसाठी केलेल्या पठडीबाहेरच्या सुधारणांचीही आठवण करून दिली. ते म्हणाले की, यात राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेशात देण्यात येणाऱ्या केडर मध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्र सरकारमध्ये तीन महिन्यांचा अनुभव मिळवण्याचा समावेश आहे.
ते म्हणाले, सुमारे दहा दशकांपूर्वी केवळ काही विशिष्ट राज्ये अव्वल क्रमांक प्राप्त यादीत दिसायची मात्र आज आपल्याकडे हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशासारखी राज्ये आहेत. ही तुलनात्मकदृष्ट्या नवीन बाब आहे. ते म्हणाले, दरवर्षी पहिल्या 3 अव्वल विद्यार्थ्यांमध्ये एक किंवा अधिक महिला उमेदवार असतात.
सीएसई 2019 च्या परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांचे स्वागत करताना, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग सचिव डॉ. सी. चंद्रमौली यांनी सर्व 20 उमेदवारांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व उमेदवारांना सल्ला दिला आहे की त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी समाज सेवा आणि राष्ट्राच्या विकासासाठी करिअरचा पर्याय म्हणून नागरी सेवेचा पर्याय निवडला आहे. ही सेवा विविध क्षेत्रात काम करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देते.
सीएसई -2019 मध्ये पहिल्या 20 जणांच्या यादीत स्थान मिळवलेले सर्वजण ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सत्कार कार्यक्रमात सामील झाले. त्यांनी आपले मत व्यक्त केले आणि देशसेवेसाठी अत्यंत उत्सुक असल्याचे सांगितले.
B.Gokhale /S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648633)
Visitor Counter : 189