रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

सार्वजनिक वाहतुकीत प्रगत सार्वजनिक मॉडेल्सचा अवलंब आणि जैव इंधन, विद्युत इंधन, सीएनजीचा वापर करण्याचे श्री गडकरी यांचे आवाहन

Posted On: 24 AUG 2020 9:32PM by PIB Mumbai

 

केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की, जैव इंधन, सीएनजी आणि इंधन म्हणून विजेवर आधारित असलेल्या सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करा येऊ शकते. चौथ्या यूआयटीपी इंडिया बस सेमिनारच्या वेबिनारमध्ये संबोधित करताना आज ते म्हणाले, बऱ्याच राज्य मार्ग परिवहन उपक्रमांमध्ये (एसआरटीयूएस) पारंपरिक इंधनावर मोठा खर्च करावा लागतो, जो खूप महाग आहे. श्री गडकरी यांनी जैव इंधन, सीएनजी आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांना वाहतुकीचे इंधन म्हणून पुढाकार घेण्यास सांगितले. ते म्हणाले की केवळ इंधन बिलामध्ये बचत होणार नाही, तर अर्थव्यवस्था आणि प्रदूषण कमी करण्यासही हातभार लागेल. श्री गडकरी म्हणाले की, सध्या देश कच्चे तेल / हायड्रोकार्बनच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. ते म्हणाले की, तो कमी करण्याची गरज आहे.

जैव इंधन/सीएनजी इत्यादींच्या कार्यक्षमतेचा संदर्भ देताना ते म्हणाले की, नागपूरने ४५० बसचे रूपांतर जैव इंधनांमध्ये करण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत तब्बल ९० बसचे रुपांतरण करण्यात आले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, दरवर्षी बससेवेचे सुमारे ६० कोटी रुपयांचे  नुकसान होते, जे बसेसना सीएनजीमध्ये रुपांतरित केल्यावर वाचविता येऊ शकेल. श्री गडकरी यांनी माहिती दिली की, सांडपाण्यापासून सीएनजीची निर्मिती करता येऊ शकते. त्यांनी राज्य मार्ग परिवहन उपक्रमांना (एसआरटीयू) आवाहन केले आहे की, नुकसान कमी करण्यासाठी हे मॉडेल अवलंबिले जावे, ज्यामुळ सार्वजनिक वाहतुकीची उत्तम सुविधा उपलब्ध होईल. धान्यांच्या पेंड्या/परळीसारख्या सीएनजीच्या इतर स्त्रोतांचा अवलंब करण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत ज्यात शेतकरी, वाहतूक, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचे अनेक फायदे आहेत.

उत्तम प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी खासगी भांडवलाचा वापर केला जावा, यासाठी लंडन बसचे मॉडेल अवलंबिण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले. तसार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वासाठी देखील त्यांना प्रोत्साहन द्यावेसे वाटले. श्री गडकरी म्हणाले, अत्याधुनिक सुविधा असलेल्या बस स्थानकांचे नियोजन केले जात आहे. चालकांकडून डबल डेकर बसचा अवलंब केल्यास सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमताही सुधारली जाईल, अशी सूचना त्यांनी केली. श्री गडकरी म्हणालेचांगले सेवक, ऑडिओ म्युझिक, व्हिडिओ फिल्म इत्यादी मनोरंजनाच्या साधनांची तरतूद बस ऑपरेटर्सने करावी, ज्यातून चांगले उत्पन्न मिळू शकेल.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1648352) Visitor Counter : 306