ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

राष्ट्रीय साखर संस्था, कानपूर येथे ऑनलाइन कार्यकारी विकास कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 24 AUG 2020 9:08PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय साखर संस्था, कानपूर येथे कार्यकारी विकास कार्यक्रमाचेऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे यांनी कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. भारतीय आणि परदेशातील सागर उद्योगातील सुमारे 100 वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. उद्घाटनपर भाषणात सचिव सुधांशू पांडे यांनी साखरेची जागतिक अर्थव्यवस्था, संबंधित अर्थशास्त्र आणि बाजारपेठेतील मागणीनुसार साखर आणि इथेनॉल उत्पादित बहुउद्देशीय साखर कारखान्यांचा विकास करण्याची अधिक आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. साखर कारखान्यांनी  जैव-ऊर्जा आणि इतर मुल्याधारीत उत्पादनांच्या माध्यमातून, गुणवत्तापूर्ण साखरेतून आत्मनिर्भरव्हावे, यावर त्यांनी भर दिला. संस्थेचे कौतुक करताना ते म्हणाले, अशाप्रकारच्या ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करावे, ज्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांचे ज्ञान समृद्ध होईल आणि आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या स्थिर साखर उद्योग निर्माण होईल.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे संयुक्त सचिव (साखर आणि प्रशासन) सुबोध कुमार सिंग यांनी साखर कारखान्यांनी उसाचा रस, साखरेचा पाक, मळी यापासून इथेनॉल निर्मिती करावी असे आवाहन केले. यामुळे इथेनॉलची उपलब्धता वाढेल आणि साखरेच्या मागणी-पुरवठ्यात संतुलन निर्माण होईल. ते म्हणाले, इथेनॉल मिश्रणाचे 10% ध्येय आहे, मात्र आपण अजूनही 5% मिश्रणावर आहोत, इथेनॉलची बाजारपेठ निश्चित आहे, त्यामुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. 

उर्जा सुरक्षा आणि परकीय चलन साठ्यात बचत होण्यासाठी स्वच्छ आणि हरित इंधन देशाच्या मोठ्या हिताचे आहे, असे ते म्हणाले. 

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1648344) आगंतुक पटल : 281
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil , Telugu