संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाच्या ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2020 8:28PM by PIB Mumbai
हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे मुख्यालय वायू भवन येथे आज ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या अॅप्लिकेशनमध्ये भारतीय हवाई दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना करिअर संबंधित माहिती आणि तपशील पुरवण्यात आला आहे.
हाताळण्यास सुलभ असलेला अॅप वापरकर्त्यांना अधिकारी आणि एअरमन पदाविषयीची निवड प्रक्रिया, प्रशिक्षण, अभ्यासक्रम, वेतन आणि सुविधा यांची माहिती एकल डिजीटल प्लॅटफॉर्मवर पुरवेल. मोबाईल अॅप अँड्राईड फोनसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून भारतीय हवाईदलाच्या समाजमाध्यमाशी जोडण्यात आले आहे, यात गेम्स आणि हवाई दलाच्या शौर्याचा इतिहास पाहायला मिळेल.
(2)FTO0.jpg)
***
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1648309)
आगंतुक पटल : 294