विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
नैनितालच्या ‘एआरआयईएस’च्या वतीने ऑनलाइन् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Posted On:
24 AUG 2020 3:53PM by PIB Mumbai
हवा-वायू यांची गुणवत्ता तसेच हवामान बदल आणि त्याचा हिमालयातल्या जलसंपदा तसेच दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम या विषयावर एक बृहद ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन आर्यभट्ट संशोधन आणि निरीक्षण विज्ञान संस्थेच्यावतीने (एआरआयईएस) करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या मध्यात म्हणजे दि. 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणा-या या विज्ञान परिषदेमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण यांच्यामुळे वायू प्रदूषणामध्ये होणारी वेगाने वाढ, क्षेत्रीय आणि जागतिक दृष्ट्या हवेची गुणवत्ता, दृष्यमानतेचा दर्जा, ढग तयार होण्याची आणि वातावरणातल्या रसायनांचे किरणोत्सर्जन, पर्यावरण तंत्रज्ञान, हिमालयातले हवामान, हिमनग, मौसमी वारे-ढग यांच्यावर होणारे परिणाम, जल उपलब्धता आणि मानवी आरोग्य याविषयी या परिषदेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारत, नेपाळ आणि बांगलादेश यांच्या संदर्भात असलेल्या महत्वाच्या पर्यावरणविषयक मुद्यांचा विचार करण्यात येणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था एआरआयईएस म्हणजेच आर्यभट्ट संशोधन आणि निरीक्षण विज्ञान संस्था तसेच हेमवतीनंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ, मध्यवर्ती विद्यापीठ, श्रीनगर, तसेच पौडी गढवाल, उत्तराखंड यांच्यावतीने या तीन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयुक्तपणे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून दि.14 ते 16 सप्टेंबर,2020 या कालावधीत ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. कोविड-19 महामारीचा उद्रेक झालेला असतानाही अशा पद्धतीने ऑनलाइन परिषदेचे नैनीतालच्या एआरआयईएसच्यावतीने पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे.
गंगेच्या पठारी प्रदेशात आणि मध्य भागामध्ये हवेचे वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यामुळे हिमालयालया हिमनगांच्या वितळण्याचे प्रमाण वाढत आहे आणि हवामान बदलांचा परिणाम तीव्रतेने जाणवत आहे, या सर्व घटनांचा आढावा घेवून परिषदेमध्ये सादरीकरण होणार आहे. जेईएसएस म्हणजेच जर्नल ऑफ अर्थ सिस्टम सायन्स यांचा विचार करून कृती कार्यक्रम आणि हिमालयातले जलस्त्रोत, हवामान यांचाही विचार करून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
नैनितालची एआरआयईएस ही संस्था वातावरणीय विज्ञान आणि हवामान या क्षेत्रामध्ये सुमारे दोन दशकांपासून कार्यरत आहे. संस्थेच्यावतीने अनेक संशोधन उपक्रम राबविण्यात आले आहेत. ‘मनोरा पीक’ या सर्वात उंच स्थाती आधुनिक उपकरणे संस्थेने बसवून त्याव्दारे हवेतल्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करण्यात येत आहे. मध्य हिमालयत क्षेत्रामध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी या उपकरणांच्या मदतीने अभ्यास केला जात आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ही संस्था सर्वांना सहकार्य करीत आहे.
या परिषदेचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी संपर्कसूत्र - डॉ. उमेश चंद्र डुमका आणि डॉ. अलोक एस गौतम
[Dr. Umesh Chandra Dumka (E-mail: dumka@aries.res.in ; 09897559451) and Dr. Alok S Gautam
(E-mail: phyalok[at]gmail[dot]com ; 09935647365) can be contacted for further details.]
Figure 1: Conference Banner
Figure 2: Conference Brochure
*****
M.Iyangar/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648185)
Visitor Counter : 235