इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आरोग्य सेतूमध्ये ओपन एपीआय सेवेचा समावेश, जनता, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा सामान्य स्थितीत परतण्यासाठी मदत करणारे आगळे वेगळे वैशिष्ट्य


भारतात नोंदणीकृत असलेल्या 50हून जास्त कर्मचारी असलेल्या संघटना आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी ही सोय उपलब्ध

ओपन एपीआय सेवेमुळे संघटनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची किंवा इतर आरोग्य सेतूधारकांच्या आरोग्याच्या स्थितीची त्यांच्या डेटा गोपनीयतेचा भंग केल्याविना माहिती मिळवणे शक्य

Posted On: 22 AUG 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2020

आपण कोविड-19 सोबत आयुष्य जगण्याची सवय निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, आरोग्य सेतू टीमने एक अतिशय नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य विकसित केले असून ओपन एपीआय सर्विस असे त्याचे नाव आहे. व्यवसाय आणि अर्थव्यवस्थांना सुरक्षित राहून पुन्हा कार्यरत होता यावे, यासाठी ओपन एपीआय सर्विस हे वैशिष्ट्य उपयुक्त ठरते. या वैशिष्ट्यामुळे संघटनांना आरोग्य सेतूची स्थिती तपासता येते आणि विविध वर्क फ्रॉम होम वैशिष्ट्यांमध्ये त्याचे एकात्मिकरण करता येते. आरोग्य सेतूच्या ओपन एपीआय सर्विसमुळे कोविड-19 संसर्गाची भीती/ धोका टाळता येतो आणि लोक, व्यवसाय आणि अर्थव्यवस्था यांना पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परतण्यास मदत होते.

2 एप्रिल 2020 रोजी हे ॲप सुरू केल्यानंतर भारताच्या कोविड-19 च्या विरोधातील लढ्यामध्ये ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत 15 कोटींपेक्षा जास्त लोकांनी हे ऍप घेतले असल्याने संपर्काचा माग घेणारे जगात सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात आलेले ऍप अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. लोकांच्या या उल्लेखनीय प्रतिसादामुळेच आरोग्य सेतूला कोविड-19च्या प्रतिबंधासाठी आणि व्यवस्थापनासाठी सरकार आणि आघाडीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे शक्य झाले आहे.

आतापर्यंत 6.6 दशलक्ष ब्लू टूथ संपर्कांचा माग काढण्यात आला आहे आणि त्यापैकी जवळपास 27 टक्के लोक संक्रमित असल्याचे आढळले आहे.  म्हणजेच आरोग्य सेतू आधारित ब्लू टूथ संपर्काचा माग आणि चाचण्या अतिशय कार्यक्षम आणि प्रभावी आहेत. त्याच प्रकारे इतर अनेकांना सावधगिरीचा आणि विलगीकरणाचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यामुळे या विषाणूच्या फैलावाची साखळी तोडणे आणि रोगाचे लवकरात लवकर प्रभावी निदान करणे आणि भारतातील मृत्यूदर कमीत कमी राखणे शक्य झाले आहे. स्थानाची माहिती वापरणारा आरोग्य सेतू इतिहास इंटरफेस आणि आरोग्य सेतू ऍनालिटिक्समुळे नव्याने तयार होणाऱ्या हॉटस्पॉट्सची माहिती पिनकोड पातळीपर्यंत अतिशय प्रभावी ठरत आहे आणि आरोग्य अधिकारी आणि प्रशासनाला आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करता येत आहेत. 30,000 पेक्षा जास्त हॉटस्पॉट्सू निश्चित करण्यात आले आहेत आणि अगदी 300 मीटरx 300 मीटर इतक्या सूक्ष्म पातळीपर्यंत ते ओळखता येत आहेत.

आरोग्य सेतू पची सुरुवात झाल्यापासून या ॲपने सातत्याने ई-पास इंटिग्रेशन, क्यूआऱ कोड स्कॅनिंग, आरोग्याच्या स्थितीची माहिती कुटुंबातील सदस्यांना/ परिचितांना उपलब्ध करून देणे यासारख्या नवीन वैशिष्ट्यांची भर घालण्याचा आणि नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. ही सर्व वैशिष्ट्ये भारताला आणि भारतीयांना सुरक्षित ठेवण्यामध्ये अतिशय प्रभावी ठरली आहेत. आरोग्य सेतू- मै सुरक्षित, हम सुरक्षित, भारत सुरक्षित या घोषवाक्याला अनुसरून ही वैशिष्ट्ये आहेत.

ओपन एपीआय सेवा

भारतात  नोंदणीकृत असलेल्या 50 हून जास्त कर्मचारी असलेल्या संघटना आणि व्यावसायिक आस्थापनांना ही सोय वापरता येणार आहे. या सेवेचा वापर करून त्यांना आरोग्य सेतू प्लिकेशनमधील माहितीची रियल टाईम चौकशी करता येणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या किंवा ज्यांनी आपल्या आरोग्याची माहिती देण्याची अनुमती या संघटनांना दिली आहे अशा इतर आरोग्य सेतू धारकांच्या आरोग्याची माहिती संघटना किंवा आस्थापनांना उपलब्ध होणार आहे. ओपन एपीआय सेवेद्वारे आरोग्य सेतू स्थिती आणि आरोग्य सेतू धारकाचे नाव( त्याच्या अनुमतीने) उपलब्ध होईल. इतर कोणतीही वैयक्तिक माहिती यातून दिली जाणार नाही.

ओपन एपीआय सेवेसाठी : https://openapi.aarogyasetu.gov.inया ठिकाणी नोंदणी करता येईल.

ओपन एपीआयशी संबंधित तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी openapi.aarogyasetu[at]gov[dot]in यांच्याशी संपर्क साधावा.

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647921) Visitor Counter : 280