विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड– 19 संसर्ग शोधणे कमी खर्चिक करून, अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने बऱ्याच संक्रमणांचा शोध घेते


ग्रामीण भागात कमी किमतीत साठवणूक करता येतील अशा कोविड १९ शोध उपकरणासाठी अभ्यास सुरू

सार्स–को–व्ही2 संसर्ग शोधण्यासाठी संशोधक अप्टामेर आधारित निदान उपकरण विकसित करीत आहेत

Posted On: 21 AUG 2020 11:45PM by PIB Mumbai

 

कोविड 19 महामारी देशभर पसरलेली असताना ग्रामीण भागात जिथे पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी त्वरित रोगनिदान विषयक सुविधा पुरविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यासाठी जास्त क्षमतेच्या साठवणुकीची आवश्यकता नसेल, अशा कमी खर्चाच्या साधनांची आवश्यकता आहे. या तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन आराखडा तयार केला आहे.

विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड एसईआरबी), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) अंतर्गत एक वैधानिक संस्था, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेरसा, रांची यांनी बायोइन्फर्मेटिक्स टूल वापरून जे निदान उपकरण विकसित करावे लागणार आहे, त्यासाठी संशोधन सुरू केले आहे.

संशोधक सार्स -को-व्ही2 संसर्गाचा शोध घेण्यासाठी ऍप्टमर आधारित निदान उपकरण विकसित करत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार प्रथम कोरोना विषाणू संसर्गाची खात्री केली जाईल तर सोबतच हे उपकरण कोविड 19 तसेच इतर विविध प्रकारच्या कोरोना विषाणूमधील (सार्स को-व्ही1, मर्स) फरक स्पष्ट करेल. 

बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा (बीआयटी मेसरा) रांचीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिमन्यू देव आणि त्याच संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. वेंकटेशन जयप्रकाश हे दोघे मिळून संशोधन कार्य करीत आहेत.

अ‍ॅप्टेमर-आधारित तंत्रज्ञान एक तुलनेने नवीन तंत्र आहे. हे अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने बर्‍याच संक्रमणांना शोधू शकते. त्याशिवाय, या उपकरणांद्वारे कोविड 19 ची चाचणी कमी खर्चीक असल्याचे आढळून आले आहे आणि या उपकरणांचा साठा सामान्य परिस्थितीत सुद्धा केला जाऊ शकतो, ज्याचा उपयोग विशेषत: ग्रामीण आणि दूरवर असलेल्या लोकसंख्येसाठी केला जाऊ शकतो आणि यामुळे पारंपारिक अँटीबॉडी-आधारित शोध तंत्राच्या तुलनेत हे उपकरण अधिक प्रभावी आहे.

रंग बदलाच्या आधारे हे संसर्ग शोधण्यासाठी वेगवान निदान उपकरण असल्याने फारच कमी वेळात कोरोना विषाणूचा संसर्ग शोधण्याचा फायदा देखील मिळणार आहे. तसेच, कमी उत्पादन खर्च आणि साठवणुकीसाठी सामान्य सुविधेची आवश्यकता यामुळे अँटीबॉडी-आधारित शोध तंत्राच्या तुलनेत हे उपकरण कमी खर्चिक असेल.

कोविड 19 संसर्गाची ऑप्टेमर-आधारित तपासणीचे योजनाबद्ध प्रतिनिधित्व दर्शविणारी आकृती

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा: डॉ. अभिमन्यू देव, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा (बीआयटी मेसरा) ईमेल: abhimanyudev@bitmesra.ac.in , मोबाईल: 9955165915

डॉ. वेंकटेशन जयप्रकाश, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा (बीआयटी मेसरा) ईमेल: venkatesanj@bitmesra.ac.in , मोबाईल: 9470137264

 

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647812) Visitor Counter : 147