राष्ट्रपती कार्यालय

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2020 8:33PM by PIB Mumbai

 

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात:-

“गणेश चतुर्थीच्या या शुभ प्रसंगी मी भारतातील आणि परदेशातील सर्व देशवासीयांना शुभेच्छा देत आहे आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे.

भगवान गणेशाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जाणारा हा उत्सव म्हणजे लोकांचा उत्साह, आनंद आणि समाजातील प्रत्येक स्तराला सोबत घेण्याच्या भावनेचे प्रतीक आहे

सध्याच्या काळात आपण कोविड-19 महामारीला तोंड देत आहोत. या महामारीवर लवकरात लवकर मात करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी भगवान गणेश आपल्याला आशीर्वाद देतील अशी मी आशा आणि प्रार्थना करतो.

या उत्सवाच्या निमित्ताने आपण देशाच्या सर्व नागरिकांमधील सौहार्द, बंधुभाव आणि एकतेची भावना बळकट करूया.”

 

संदेश हिंदी मध्ये वाचण्यासाठी क्लिक करा

 

M.Chopade/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1647743) आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Bengali , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu