भारतीय स्पर्धा आयोग

सी अँड एस इलेक्ट्रीक लिमिटेडच्या संपादनासाठी सीमेन्स इंडियाने दिलेल्या प्रस्तावाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजूरी

Posted On: 20 AUG 2020 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2020


सीमेन्स लिमिटेड या कंपनीकडून सी ऍन्ड एस इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीच्या प्रस्तावित अधिग्रहणाला सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिली आहे. या प्रस्तावित एकीकरणामध्ये सीमेन्स लिमिटेडकडून(सीमेन्स इंडिया) सी ऍन्ड एस इलेक्ट्रिक लिमिटेडच्या 100 टक्के भाग भांडवलाच्या अधिग्रहणाचा समावेश आहे. या प्रस्तावित एकीकरणाच्या वेळी सी एन्ड एसच्या व्यवसायामध्ये लो व्होल्टेज(एलव्ही) स्विचगिअर कॉम्पोनन्टस् आणि पॅनेल, एलव्ही आणि मिडियम व्होल्टेज(एमव्ही) पॉवर बसबार्स त्याचबरोबर संरक्षक आणि मिटरींग उपकरणे यांचा समावेश आहे. सी एन्ड एसच्या एमव्ही स्विचगिअर आणि पॅकेज सबस्टेशन, लायटिंग, डिझेल जनरेटिंग संच, इंजिनिअरिंग, खरेदी आणि बांधकाम व्यवसाय आणि इटाकॉम बसबार्स व्यवसाय यांसारखे इतर काही विशिष्ट व्यवसाय सी एन्ड एसच्या सध्या अस्तित्वात असलेल्या प्रवर्तकांकडे कायम ठेवले जातील.

सीमेन्स इंडिया उर्जा निर्मिती आणि वितरण, इमारतींसाठी इंटेलिजेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि वितरित उर्जा प्रणाली आणि उत्पादन उद्योग आणि प्रक्रियांमध्ये ऑटोमेशन आणि डिजिटलायजेशन यावर भर देत आहे. तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतूक आणि स्मार्ट शहरांच्या पायाभूत सुविधा प्रणालीसाठी ही कंपनी स्मार्ट उपकरणांचा पुरवठा करते.

तर सी ऍन्ड एस कंपनी इलेक्ट्रिकल स्विचगिअरची मालिका, पॉवर प्रोटेक्शन आणि वीज वितरण उत्पादने यांची निर्मिती करते. तसेच या कंपनीकडून विविध उद्योग आणि व्यावसायिक विद्युतीकरणासाठी, उर्जा निर्मिती केंद्र आणि उपकेंद्रांसाठी उपकरणे आणि सामग्रीचा पुरवठा केला जातो. त्याच प्रकारे सौर फोटो व्होल्टेक उर्जा प्रकल्पांना जोडणाऱ्या ग्रीडची रचना आणि उभारणीचे कामही या कंपनीकडून करण्यात येते.

भारतीय स्पर्धा आयोग (CCI) च्या आदेशामधील तपशिलानुसार हे अंमलात येईल.

 

* * *

BG/VS/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1647475) Visitor Counter : 174