श्रम आणि रोजगार मंत्रालय

संतोष गंगवार यांनी श्रम विभागाचा लोगो प्रसिद्ध केला, धोरण आखणीत डेटा बेस अतिशय महत्वाचा असल्याचे केले प्रतिपादन

Posted On: 20 AUG 2020 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2020


श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय असलेल्या श्रम विभागाचा अधिकृत लोगो आज नवी दिल्लीत श्रम शक्ती भवन  येथे श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)  संतोषकुमार गंगवार यांनी प्रसिद्ध केला. श्रम  विभागाची कल्पना आणि उद्दिष्टे दृश्य स्वरूपात पोहचवण्यासाठी हा लोगो तयार करण्यात आला असून या कार्यक्रमाला श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव हीरालाल समारिया, आणि  श्रम विभागाचे महासंचालक डी. पी. एस नेगी,  मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रयत्नांचे कौतुक करताना श्रम मंत्र्यांनी नमूद केले की कौटुंबिक अर्थसंकल्प चौकशी करणे आणि देशातील महत्त्वाच्या केंद्रांसाठी समान आधारावर जीवनावश्यक  खर्च निर्देशांकाची आकडेवारी संकलित करण्याच्या उद्देशाने 1941 मध्ये सिमला येथे जीवनावश्यक खर्च महासंचालनालय म्हणून श्रम विभागाची स्थापना करण्यात आली. कामगार धोरण आखणीच्या संदर्भात अधिक व्यापक कामगार आकडेवारीची आवश्यकता भासल्यामुळे 1 ऑक्टोबर 1946 रोजी जीवनावश्यक खर्च महासंचालनालयाचे नाव बदलून  श्रम विभागाची अतिरिक्त कामांसह स्थापना झाली. तेव्हापासून श्रम विभाग अखिल भारतीय पातळीवर कामगारांच्या विविध पैलूंबाबत  आकडेवारी गोळा करणे , संकलन, विश्लेषण आणि प्रसार करण्याचे काम करत आहे.

गंगवार यांनी श्रम विभागाला  त्याच्या प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटलकरण आणि दैनंदिन कामकाजात डाटा अनॅलिटीक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्याची व्याप्ती वाढवायला  सांगितले.

गंगवार यांनी धोरण आखणीत डेटा बेसचे महत्त्व अधोरेखित केले. अगदी कमी अवधीत अधिकाधिक आणि अचूक डेटा उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा  वापर वाढवण्याचे आवाहन केले. कागद विरहित काम करण्याकडे लवकरच वळण्याची  गरज असल्याचे सांगत त्यांनी विश्वास व्यक्त केला की डिजिटायझेशन  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता  कमी वेळात मोठ्या डेटाचे संकलन आणि विश्लेषण करण्यात मदत करेल. ते पुढे म्हणाले की, सरकार रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने काम करत असल्यामुळे त्यासाठी अचूक डेटा अतिशय महत्वाचा आहे.

यावेळी श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे मंत्री आणि सचिव  यांनी पत्रकारांना सांगितले की, शंभर वर्ष जुन्या कामगार कायद्यांची चार संहितांमध्ये विभागणी केली जात आहे, यापैकी वेतन संहिता यापूर्वीच लागू केली आहे आणि तीन संहिता - सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी स्थिती यापूर्वीच लोकसभेत मांडण्यात आले आहे. आणि एकदा का ते लागू झाले कि “व्यवसाय सुलभता ” वरील भारताचे मानांकन उच्चांकी झेप घेईल आणि भारत गुंतवणूकीसाठी प्राधान्य केंद्र बनेल.. श्रम विभागाने संहितांमधील  आवश्यक तरतुदींसाठी वेगाने डाटा गोळा करावा. श्रम विभागाला वैधानिक अधिकार देण्यासाठी नियम आखले जातील.

श्रम सचिवांनी श्रम विभागाला 100 टक्के डिजिटायझेशनसाठी सज्ज राहण्याचे आणि पाठपुरावा करणारे  अन्वेषक व सर्वेक्षक  सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. श्रम कायदा सुधारणांच्या अनुषंगाने डाटा संकलनाची तयारी करण्याची सूचना त्यांनी विभागाला केली.  त्यासाठी डाटा संकलन आणि कार्यपद्धतींचे स्वरूप  आणि प्रकारांमध्ये बदल करावे लागतील.

नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला लोगो सूचित करतो की श्रम विभाग ही डाटा -आधारित संघटना आहे  जी कामगार आणि कार्याशी संबंधित डेटाचे काम करते. दर्जेदार डेटा निर्माण करण्यासाठी अचूकता, वैधता आणि विश्वासार्हता आवश्यक असून या तीन उद्दिष्टांचे हा लोगो प्रतिनिधित्व करतो. निळे चाक हे कॉग व्हील आहे जे कामांचे प्रतिनिधित्व करते, निळ्या रंगाची निवड  आम्ही  कामगारांबरोबर काम करत असल्याचे  दर्शविते, वास्तविक जगातील डेटामध्ये -चढ उतार असल्यामुळे आलेख केवळ वर जात नाही. राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांशी जुळणारा तिरंगी आलेख आणि त्याच्याबरोबर ग्रामीण  शेतीच्या श्रमाचे फळ दर्शविणाऱ्या  गव्हाच्या ओंब्यां   लोगोमध्ये सुंदर तऱ्हेने मांडण्यात आल्या आहेत.

श्रम विभागाचे  कार्यक्षेत्र औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक, औद्योगिक , कृषी आणि  ग्रामीण कामगारांसाठी कृषी व ग्रामीण कामगार संख्या,   रोजगार / बेरोजगारी संदर्भात वेतन दर निर्देशांक आणि डाटा यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक निर्देशांकाचे भांडार म्हणून  करण्याचे आहे. श्रम विभाग  ही कामगार आकडेवारीच्या क्षेत्रातील  राष्ट्रीय स्तरावरील एक सर्वोच्च संस्था आहे जी कामगार माहिती, संशोधन, देखरेख / मूल्यांकन आणि प्रशिक्षण यासारखी महत्त्वपूर्ण कार्ये करते.  

व्हिडिओ लिंक साठी येथे क्लिक करा

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane



(Release ID: 1647322) Visitor Counter : 250