अर्थ मंत्रालय

वाढत्या मागण्या लक्षात घेऊन अधिक लवचिकतेसह आंशिक पत हमी योजनेचा (पीसीजीएस) 2.0 चा अवधी वाढवण्यात आला

Posted On: 17 AUG 2020 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020


केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून 20.05.2020 ला आंशिक पत हमी योजना (पीसीजीएस) 2.0 सुरु करण्यात आली. एनबीएफसी, एचएफसी,एमएफआय कडून जारी AA किंवा त्याखालील रेटिंग असणारे रोखे किंवा कमर्शियल पेपर (सीपी), सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून  खरेदी करण्यासाठी पोर्ट फोलिओ हमी पुरवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

(पीसीजीएस) 2.0 अंतर्गत सुमारे 45,000 कोटी रूपयांचे  कर्जरोखे,सीपी खरेदी अपेक्षित आहे, त्याअंतर्गत AA/AA- मानांकन असणाऱ्या रोखे,सीपीच्या  एकूण पोर्टफोलीओच्या  25 % म्हणजे 11,250 कोटीच्या  खरेदीला परवानगी होती. याशिवाय सरकारने, एनबीएफसी, एचएफसी कडून जारी सीपी आणि अपरिवर्तनीय डिबेचर खरेदी साठी  विशेष तरलता योजना वेगळी जाहीर केली ज्यांची  3 महिन्यांची परिपक्वता उरली आहे  आणि आणखी तीन महिन्यासाठी हि मुदत वाढवता येणार आहे. याअंतर्गत  जास्तीत जास्त 30,000 कोटी रूपया पर्यंत खरेदी करता येत होती

 (पीसीजीएस) 2.0 अंतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना एए/ एए- मानांकन असणाऱ्या, 28 संस्थांनी जारी केलेल्या आणि एए- पेक्षा कमी मानांकन असणाऱ्या 62 संस्था कडून जारी रोखे,सीपीच्या, 21,262 कोटी रुपयांच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे.

 या योजने अंतर्गत झालेली प्रगती लक्षात घेऊन आणि एए/ एए- मानांकन रोखे आणि सीपी मर्यादा जवळ जवळ गाठली आहे तर कमी रेटिंगचे रोखे आणि सीपीची प्रगती मात्र कमी राहिली  आहे हे लक्षात घेऊन सरकारने  (पीसीजीएस) 2.0 मध्ये सुधारणा केली आहे-

  • पोर्टफोलीओ निर्माण करण्यासाठी अतिरिक्त 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सहा महिन्या नंतर19.11.2020 पर्यंत, हमी अमलात येण्यासाठी प्रत्यक्ष वितरीत रकमेच्या आधारावर  पोर्टफोलीओला निश्चित स्वरूप  देण्यात येईल.
  • योजने अंतर्गत पोर्टफोलीओ स्तरावर AA आणि AA- गुंतवणूक सब पोर्टफोलीओ हा या योजने अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी खरेदी केलेल्या  रोखे/सीपीच्या एकूण पोर्टफोलीओ 50%पेक्षा जास्त असता कामा नये.( याआधी ही 25% होती.)

या सुधारणेमुळे पीसीजीएस 2.0 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना रोखे/सीपी खरेदीसाठी अधिक लवचिकता प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.


* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1646505) Visitor Counter : 254