शिक्षण मंत्रालय
उपराष्ट्रपती उद्या नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांच्या अटल रँकिंग (ARIIA) 2020 चा निकाल जाहीर करणार
रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि संजय शामराव धोत्रे हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार
ARIIA हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे जो भारतातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना नवोन्मेष संबंधी निर्देशकांवर क्रमवारी प्रदान करतो
प्रथमच ARIIA-2020 मध्ये केवळ महिलांसाठी असलेल्या उच्च शैक्षणिक संस्थांसाठी विशेष बक्षीस श्रेणी
Posted On:
17 AUG 2020 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2020
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू उद्या 18 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे यांच्या उपस्थिती मध्ये नाविन्यपूर्ण कामगिरीवरील संस्थाची अटल क्रमवारी (एआरआयआयए) 2020 चा निकाल जाहीर करणार आहेत. आभासी पद्धतीने हे निकाल जाहीर केले जातील आणि उच्च शिक्षण सचिव अमित खरे आणि सरकारी, अशासकीय आणि उच्च शिक्षण संस्थांचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
एआरआयआयए हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम असून, विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये नवोन्मेष, स्टार्टअप आणि उद्योजकता विकासाशी संबंधित निर्देशकांवर भारतातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना योग्य क्रमवारी प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या एआईसीटीई आणि मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागाद्वारे या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते.
एआरआयआयए 2020 मध्ये सहा पुरस्कार श्रेणी असतील ज्यात केवळ महिलांसाठी असलेल्या उच्च शैक्षणिक संस्थांसाठी विशेष श्रेणीचा समवेश करण्यात आला आहे; महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि नवोन्मेष आणि उद्योजकता क्षेत्रात लैंगिक समानता आणण्यासाठी ही श्रेणी सुरु करण्यात आली असून यामध्ये केवळ उच्च शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल. इतर पाच श्रेणी आहेत – 1. केंद्रीय अनुदानीत संस्था 2. राज्य अर्थसहाय्यित विद्यापीठे 3. राज्य अनुदानीत स्वायत्त संस्था 4. खाजगी / डीम्ड विद्यापीठे आणि 5. खासगी संस्था.
जागतिक नवोन्मेष सूची क्रमवारीत भारताच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षात भारताने जागतिक नवोन्मेष सूची मध्ये भारताने 29 अंकांची वृद्धी प्राप्त केली आहे. 2014 मध्ये भारत 81 व्या स्थानावर होता तर 2019 मध्ये भारताने आपल्या कामगिरीत सुधारणा करत 52 वे स्थान प्राप्त केले आहे. एआयसीटीईचा विश्वास आहे की येत्या काही वर्षांत, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या दिशेने सुरु केलेल्या उपक्रमांमुळे भारत जागतिक नवोन्मेषावर सकारात्मक प्रभाव पाडेल. ते पुढे म्हणाले की, एआरआयआयए शिक्षण संस्थांमधून प्राप्त होणाऱ्या नवकल्पनांच्या गुणवत्तेवर आणि परिमाणावर लक्ष केंद्रित करते आणि या नवकल्पनांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केलेल्या वास्तविक परिणामाचे मोजमाप करते.
एआरआयआयए मूल्यांकन समितीचे अध्यक्ष बीव्हीआर मोहन रेड्डी यांच्या मते, नवीन भारत बदलत आहे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन शिक्षण संस्था या बदलामध्ये सहभागी होत आहेत. एआरआयआयए ही एक रचना आहे जी आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये होत असलेल्या या बदलाचे मोजमाप करते.
एआरआयआयए भविष्यातील विकासासाठी आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक आणि नाविन्यपूर्णतेच्या अग्रस्थानी जाण्यासाठी संस्थांसाठी दिशा निश्चित करेल, असे एमएचआरडीच्या नवोन्मेष विभागाचे मुख्य नावोन्मेष अधिकारी डॉ. अभय जेरे यांनी नमूद केले. एआरआयआय क्रमवारी भारतीय संस्थांना निश्चितच प्रेरणा प्रदान करेल आणि त्यांच्यात विचार-प्रवर्तन घडवून भारतातील उच्च प्रतीचे संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिसंस्था तयार करेल.
मागील वर्षी, एआरआयए 2019 दरम्यान, 'सार्वजनिक अर्थसहाय्य' मधील अव्वल 10 संस्था आणि 'खाजगी व स्व-वित्त' श्रेणीतील 5 संस्था जाहीर करण्यात आल्या आणि सर्वोच्च स्थान प्राप्त केलेल्या संस्थांचा 8 एप्रिल, 2019 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सन्मान करण्यात आला.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646503)
Visitor Counter : 193