ऊर्जा मंत्रालय

कोळशाच्या राखेचा वापर वाढविण्यासाठी एनटीपीसीने रिहांद येथे पायाभूत सुविधा विकसित केल्या

Posted On: 16 AUG 2020 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020

ऊर्जा मंत्रालयाचा सार्वजनिक उपक्रम असलेली आणि देशातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी एनटीपीसी लिमिटेडने दूरवरच्या सिमेंट प्रकल्पांना स्वस्त दरात कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी उत्तरप्रदेशातील रिहांद प्रकल्पात पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत.

एनटीपीसी लिमिटेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील टीकरिया  येथील 458 कि.मी. अंतरावरील  एसीसी सिमेंट उत्पादक प्रकल्पाला कोळशाची राख पुरविण्यासाठी 3450 मेट्रिक टन (एमटी) कोळशाची राख वाहून  नेणाऱ्या बीओएक्सएन प्रकारच्या रेल्वे वॅगनच्या पहिल्या रेकला एनटीपीसीच्या रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे कार्यकारी संचालक बालाजी अय्यंगार यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविला.

दुर्गम स्थानावरून उपभोग केंद्राकडे कोळशाच्या राखेच्या वाहतुकीसाठी नवीन युगाची ही सुरुवात असल्याचे या प्रयत्नातून सूचित होते. याद्वारे भारतीय रेल्वेसाठी अतिरिक्त साहित्य भारनियमन मार्गाच्या उपलब्धतेसह कोळशाच्या राखेचा वापर वाढविण्यासाठी सिमेंट सयंत्रणा सक्षम करेल तसेच यामुळे सिमेंट प्रकल्पांना पर्यावरणाला अनुकूल व स्वस्त दरात कोळशाची राख उपलब्ध होईल. सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुमारे 44.33 दशलक्ष टन कोळशाची राख विविध उत्पादक कामांसाठी वापरली गेली, ज्याचे प्रमाण 73.31 टक्के होते.

शिवाय, सिमेंट कॉंक्रिटमध्ये बारीक वाळूच्या वापराऐवजी कोळशाच्या राखेचा वापर करून त्यावर आधारित जिओ-पॉलिमर रस्ते, तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच, निर्यातीच्या उद्देशाने कोळसा राख वर्गवारी प्रकल्प सुरू करण्याची एनटीपीसीची योजना आहे.

एकूण 62.9 गिगावॅट स्थापित क्षमतेचे एनटीपीसी समूहाकडे 70 ऊर्जा प्रकल्प असून त्यात 24 कोळशाचे, 7 एकत्रित सायकल गॅस / लिक्विड इंधन, 1जलविद्युत, 13 नवीकरणीय व 25 सहाय्यक व संयुक्त उपक्रम ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. या गटाची 20 गीगावॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे, त्यामध्ये 5 गीगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646291) Visitor Counter : 180