कृषी मंत्रालय
खरीप पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.54% वाढ
सर्व खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रामध्ये सुधारणा
Posted On:
14 AUG 2020 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्रात समाधानकारक प्रगती झाली आहे. 14.08.2020 पर्यंत 1015.58 लाख हेक्टर क्षेत्रावर एकूण खरीप पिकाची पेरणी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 935.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे देशात मागील वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्र 8.54% ने वाढले आहे. पेरणी केलेले पीक निहाय क्षेत्र खालीलप्रमाणे आहेः
तांदूळ: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 308.51 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी सुमारे 351.86 लाख हेक्टर क्षेत्रावर भातशेती, गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.35 लाख हेक्टर इतकी वाढ
डाळी: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 121.50 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी सुमारे 124.01 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड , गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.51 लाख हेक्टर इतकी वाढ
भरड धान्ये : गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 162.28 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी सुमारे 168.12 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड , गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.84 लाख हेक्टर इतकी वाढ
तेलबिया: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 163.57 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी सुमारे 187.14 लाख हेक्टर क्षेत्र , गेल्या वर्षीच्या तुलनेत 23.56 लाख हेक्टर इतकी वाढ
ऊस: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 51.40 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी सुमारे 52.02 लाख हेक्टर क्षेत्र , गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.62 लाख हेक्टर इतकी वाढ
जूट आणि मेस्ता: गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 6.85 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी सुमारे 6.96 लाख हेक्टर क्षेत्र , गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.11 लाख हेक्टर इतकी वाढ
कापूस : गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 121.58 लाख हेक्टरच्या तुलनेत यावर्षी सुमारे 125.48 लाख हेक्टर क्षेत्र , गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.90 लाख हेक्टर इतकी वाढ
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) अहवाल दिला आहे की, देशातील विविध भागांमधील 123 जलाशयांमध्ये सध्याचा पाणी साठा मागील वर्षाच्या याच कालावधीतील पाणीसाठयाच्या 88% टक्के आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645946)
Visitor Counter : 233