आदिवासी विकास मंत्रालय

अर्जुन मुंडा 17 ऑगस्ट 2020 रोजी "स्वास्थ्य" या आदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टलचा ई-प्रारंभ करणार

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2020 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020


केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा 17 ऑगस्ट 2020 रोजी भारतातील आदिवासींच्या आरोग्य आणि कल्याणासाठी "स्वास्थ्य" या आदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टलचा ई-प्रारंभ करणार  आहेत. या  कार्यक्रमाला राज्यमंत्री रेणुका सिंह सरुता उपस्थित राहणार आहेत. आदिवासी कल्याण मंत्रालयाने पिरामल स्वास्थ्य या उत्कृष्टता केंद्राच्या सहकार्याने, आदिवासींचे आरोग्य आणि अनुसूचित जमातीशी संबंधित पोषणविषयक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे ‘स्वास्थ्य’  हे आदिवासी आरोग्य व पोषण पोर्टल विकसित केले आहे.

देशातील आदिवासी’ लोकसंख्येच्या आरोग्य आणि पोषण संबंधित माहितीसाठी ‘स्वास्थ्य’ हे अशा प्रकारचे पहिले सर्वसमावेशक  व्यासपीठ आहे. यात डॅशबोर्ड, नॉलेज रेपॉजिटरी, पार्टनर सेगमेंट, सिकल सेल डिसिजिस (एससीडी) सपोर्ट कॉर्नर आहे. 177 उच्च प्राथमिकता असलेल्या आदिवासी जिल्ह्यांसाठी डॅशबोर्डमध्ये विविध स्रोतांकडून संकलित माहिती आहे. याव्यतिरिक्त, पोर्टलमध्ये आदिवासींचे आरोग्य आणि पोषण संबंधी अनेक स्त्रोतांकडून प्राप्त आदिवासी समुदायावरील संशोधन अभ्यास, नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धती देखील आहेत. याव्यतिरिक्त, पोर्टलमधील  सिकल सेल डिसीज सपोर्ट कॉर्नर सिकल सेल रोग असलेल्या लोंकाना स्वतःची नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करते.  हे पोर्टल विद्यमान ज्ञानाचा पूल साधेल, पुरावा-आधारित धोरण तयार करेल आणि विविध उपाययोजनांना  उत्तेजन देईल ज्यामुळे देशातील  आदिवासींच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत व्यापक  सुधारणा होईल अशी आशा आहे.

पिरामल स्वास्थ्य व्यवस्थापन आणि संशोधन संस्थेच्या सहकार्याने आदिवासी कल्याण  मंत्रालयाने स्थापन  केलेल्या पोर्टलचे व्यवस्थापन आरोग्य आणि पोषण  ज्ञान व्यवस्थापनातील उत्कृष्टता केंद्राद्वारे  केले जाईल. आदिवासींचे आरोग्य आणि पोषण परिणाम सुधारण्यासाठी आदिवासींचे आरोग्य आणि पोषणाची  माहिती,संकलित करणे, पुरावे-आधारित धोरण तयार करणे, यशस्वी मॉडेल्स, उत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपायचे दस्तऐवजीकरण, ज्ञानाचा प्रसार व आदानप्रदान सुलभ करणे , नेटवर्क तयार करणे आणि हितधारकांशी सहकार्यासाठी हे केंद्र काम करते.


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1645933) आगंतुक पटल : 296
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil