सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

धोरण तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवरील समस्यांचा क्षेत्र आणि उद्योगनिहाय अभ्यास करणे ही काळाची गरज: नितीन गडकरी

Posted On: 14 AUG 2020 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020


नवीन धोरणे तयार करताना विचार गटांनी स्थानिक पातळीवरील समस्यांचा क्षेत्रनिहाय आणि उद्योगनिहाय अभ्यास करण्याची गरज आहे जेणेकरुन त्यांच्या शिफारशी लक्षात घेऊन नवीन धोरणे आखता येतील यावर केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जोर दिला. ते आज एका वेबिनारला संबोधित करत होते. एमएसएमई सदस्य संस्था आणि फिक्कीच्या क्षेत्रीय संघटनांशी संवाद साधताना ते म्हणाले की प्लास्टिक, वस्त्र, चामडे, औषधनिर्माण इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांना अनन्य समस्या आहेत. त्यांनी फिक्की आणि इतर उद्योग संघटनांना विविध विचार गटांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील समस्यांचा अभ्यास करण्याची आणि त्यांच्या शिफारसी सादर करण्याची विनंती केली जेणेकरुन विविध समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेता येतील.

उद्योजकांनी आत्मनिर्भर भारत अभियान उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले जेणेकरून देशाची आयात कमी होईल आणि देशातील उत्पादन आणि निर्मिती क्षमता वृद्धिंगत होऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतील 

"देशभरात विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि कृषी क्षेत्रात औद्योगिक संकुल विकसित करण्याहे आम्ही प्रयत्न करीत आहोत," गडकरी म्हणाले. सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्थेसाठी धोरण निश्चित केले जात आहे ज्यामुळे अत्यंत लहान उद्योजक, व्यवसाय आणि दुकान मालक इ. साठी 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल असे ते म्हणाले. 

शारीरिक अंतर हा आता नवीन नियम असल्याने एमएसएमईमधील ऑटोमेशन आणि डिजीटलिझेशनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाळावे, अशी सूचनाही मंत्र्यांनी केली.

उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींनी इतर सूचनांसह आघाडीच्या 50,000 एमएसएमईची ऑनलाईन डिजिटल निर्देशिका तयार करण्याचे सुचविले व आत्मनिर्भर भारत अभियानाच्या उद्देशाने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645786) Visitor Counter : 189