जलशक्ती मंत्रालय

देशातील 123 जलाशयांमध्ये 13.08.2020 रोजी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 88% आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठयाच्या तुलनेत 98% जलसाठा आहे

Posted On: 13 AUG 2020 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

देशातील 123 जलाशयांमधील पाणीसाठ्यावर साप्ताहिक स्वरूपात देखरेख करत आहे. या  जलाशयांपैकी  43 जलाशयांमधून 60 मेगावॅटहून अधिक  स्थापित क्षमता जलविद्युत निर्मिती होते. या  123 जलाशयांची एकूण जलसाठा क्षमता 171.090 बीसीएम आहे जी देशभरातील अंदाजित पाणीसाठयाच्या अंदाजे  66.36 टक्के आहे. दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या  जलाशय साठा बुलेटिन अनुसार,या जलाशयांमध्ये सध्या 92.916 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 54% आहे. गेल्या वर्षी याच  काळात हा पाणीसाठा 105.856 बीसीएम होता. अशा प्रकारे  13 ऑगस्ट 2020 रोजी जारी  बुलेटिन अनुसार, 123 जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 88% आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठयाच्या तुलनेत 98% जलसाठा आहे .

पश्चिम क्षेत्रांमध्ये  गुजरात आणि महाराष्ट्रचा समावेश आहे.  सीडब्ल्यूसीच्या देखरेखीअंतर्गत  42 जलाशय येतात. त्यांची पाणीसाठा क्षमता 35.24 बीसीएम आहे.  जलाशय साठा बुलेटिन दिनांक 13.08.2020 अनुसार, या जलाशयांमध्ये सध्या  19.02 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या  54 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा  70 टक्के होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा आहे

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645640) Visitor Counter : 189