संरक्षण मंत्रालय

व्हाईस ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम यांनी डायरेक्टर जनरल नेवल ऑपरेशन्स (डीजीएनओ) म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 13 AUG 2020 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

व्हाईस ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम यांनी आज नेवल ऑपरेशन्स (डीजीएनओ) चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत आणि  01 जुलै  85 रोजी नौदलात  रुजू झाले .

फ्लॅग अधिकारी असलेले त्रिपाठी  कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉर फेअरमधील तज्ञ आहेत आणि त्यांनी नौदलचे  सिग्नल कम्युनिकेशन ऑफिसर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर ऑफिसर म्हणून काम केले आहे आणि नंतर आयएनएस मुंबई या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकेवर कार्यकारी अधिकारी आणि  प्रधान युद्ध अधिकारी म्हणून काम केले आहे.

ते वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे पदवीधर असून तिथे त्यांना थिमैय्या पदक देण्यात आले, व्हाईस ऍडमिरल  दिनेश के त्रिपाठी यांनी 2007-08 मध्ये अमेरिकेच्या नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, र्‍होड आयलँड येथे नेव्हल हायर कमांड कोर्स आणि नेव्हल कमांड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी प्रतिष्ठित रॉबर्ट ई बेटम,बेटमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

त्यांनी आयएनएस विनाश, आयएनएस किर्च आणि आयएनएस त्रिशूल वर तसेच मुंबईतील वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स अधिकारी, कॅप्टन (नेव्हल ऑपरेशन्स), सीएमडी (नेटवर्क सेंटरिक ऑपरेशन्स), प्रधान संचालक नेव्हल प्लॅन्स, आणि नौदल मुख्यालयातील नौदल स्टाफचे सहाय्यक चीफ (धोरण व योजना) म्हणून कार्यरत होते.

फ्लॅग ऑफिसरनी 15 जाने 2018 ते  30 मार्च 2019 दरम्यान ईस्टर्न फ्लीटचे नेतृत्व केले. जून2019  मध्ये वाइस अ‍ॅडमिरल पदावर पदोन्नती मिळाल्यावर त्यांची नेमणूक केरळ येथील प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट म्हणून झाली. सशस्त्र दलांच्या  सर्वोच्च कमांडरकडून नोव्हेंबर 2019 मध्ये अकादमीला प्रेसिडेन्ट कलरने  सन्मानित केले होते.

फ्लॅग ऑफिसरना कर्तव्यनिष्ठेसाठी अति विशिष्ठ सेवा पदक आणि नौसेना पदक देऊन गौरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, लष्करी इतिहास, आणि कला आणि नेतृत्व यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे.

 

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645638) Visitor Counter : 145