संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम आणि ओएफबीने विकसित केलेल्या 15 उत्पादनांचा केला शुभारंभ


संरक्षण मंत्रालयाकडून आत्मनिर्भर भारत सप्ताह कार्यक्रम सुरू

Posted On: 13 AUG 2020 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे 'आत्मनिर्भर भारत' सप्ताहाचा  भाग म्हणून संबंधित डीपीएसयू / ओएफबी द्वारा विकसित केलेल्या उत्पादनांचा शुभारंभ केला असून उद्यापर्यंत म्हणजे  14 ऑगस्ट  2020 पर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत ओएफबी आणि बीईएमएलची चार उत्पादने, बीईएलची दोन आणि एचएएल, बीडीएल, एमडीएल, जीआरएसई आणि जीएसएल यांचे प्रत्येकी एक उत्पादन सुरू केले. संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार,  संरक्षण उत्पादन सचिव राज कुमार आणि डीडीपीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डीपीएसयूचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आणि  ओएफबीचे अध्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्स लिंकद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांना संबोधित करतांना राजनाथ सिंह म्हणाले, संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता हे आत्मनिर्भर अभियान मधील प्रमुख उद्दीष्टांपैकी एक आहे.स्वयंपूर्णतेचे  ध्येय साकारण्यासाठी आत्मनिर्भर भारत मोहीम भारताच्या संरक्षण उत्पादनास आवश्यक चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय,यांनी खरेदी पद्धतींचे सुसूत्रीकरण करणे  ,  उत्पादन धोरण आणि स्वदेशीकरणासाठी केलेल्या समन्वित प्रयत्नांमुळे स्वदेशी संरक्षण उत्पादनांचा विकास आणि उत्पादन सुनिश्चित होईल ज्यामुळे आयातीवरील आपले अवलंबत्व  कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होईल,यातून  देशांतर्गत उद्योगाच्या विकासाला  प्रोत्साहन मिळेल, भारत बाह्य दबावापासून मुक्त होईल  आणि संरक्षण उपकरणांना कायम स्वरूपी सुटे भाग आणि सेवांची मदत मिळत राहील.

ओएफबीच्या कॉर्पोरेटायझेशनचा संदर्भ देताना राजनाथ सिंह म्हणाले की, जर सरकारी मालकीच्या संरक्षण उद्योगांना  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायची असेल तर कालबाह्य पद्धती बंद करायला हव्यात. देशातील संरक्षण उद्योगांना देशाची कार्यक्षमतेने सेवा बजावण्यात मदत करण्यासाठी आपण आधुनिक व्यवस्थापन तंत्र, तंत्रज्ञान वापर आणि  सहयोगात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने सरकारने ओएफबीच्या कॉर्पोरेटायझेशनच्या  दिशेने पाऊल उचलले आहे. मला खात्री आहे की यामुळे नियंत्रित किंमतीची मर्यादा दूर करण्यात मदत होईलच तसेच  कॉर्पोरेट व्यवस्थापन पद्धती आणि कार्यकुशल प्रणालींचा वापर वाढेल. मला वाटते की ओएफबीसाठी स्वतःचा नव्याने शोध घेण्यासाठी हे एक आव्हान असेल आणि यात  ते यशस्वी होतील.

आज सादर करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये डीआरडीएल, हैदराबाद यांच्या सहकार्याने ऑर्डनन्स फॅक्टरी मेडक यांनी विकसित केलेल्या नाग मिसाइल कॅरियरचा (नामिका) प्रोटोटाइप  आहे. नामिकामध्ये पहिल्या टप्प्यात 260 कोटी  रुपयांपर्यंत आयातीला पर्याय उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. जी कदाचित 3000 कोटींपेक्षा जास्त होईल. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाची इतर उत्पादने जसे की संपूर्ण स्वदेशी 14.5 एमएम अँटी मटेरियल रायफल, ऑर्डनन्स फॅक्टरी त्रिची येथे विद्यमान सुविधांसह तयार केली जात आहे, टी 90 मेन बॅटल टँकसाठी अपग्रेडेड कमांडर थर्मल इमेजर कम डे साइट आणि रायफल  फॅक्टरी ईशापूर यांनी  विकसित केलेला 8.6x70 एमएम स्निपरचा प्रोटोटाइप यांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाने बीईएमएलचे आज सुरू केलेल्या उत्पादनांसाठी कौतुक केले.  स्वदेशीकरण आणि आयात कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न प्रभावी आहेत असे  ते म्हणाले.  सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक मायनिंग डंप ट्रक पैकी एक असलेला 150  टन पेलोड क्षमता डंप ट्रक आणि 180 ​​टन क्षमतेचा सुपर जायंट मायनिंग एस्केवेटर , दोन्हीची  स्वदेशी रचना आणि निर्मिती असून आयात केलेल्या उपकरणापेक्षा  20% हून अधिक स्वस्त आहेत. यामुळे अनुक्रमे 1500 कोटी आणि  220 कोटी रुपये इतकी परकीय चलनात बचत होईल  हे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर उत्पादने आहेत.  गौर , उच्च गतिशील चेसिसवर बनवलेले बीईएमएल मीडियम बुलेट प्रूफ वाहन,आणि अनुकूल संरक्षण पातळी आणि कस्टम बिल्ट हेलीपोर्टेबल 100 एचपी डोझर, ज्यांची पातळी अनुक्रमे 85 % आणि 94% आहे , ती देखील उल्लेखनीय उत्पादने आहेत असे ते म्हणले.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, एचएएलच्या 150 व्या डिओ -228 विमानाची सुरुवात स्वदेशी निर्मितीत  एक मैलाचा दगड आहे.  150 व्या विमानाचे आयएन -259  म्हणून नामकरण आणि  मेरीटाईम रेकॉनिसन्स आणि इंटेलिजन्स वॉरफेअर मध्ये भारतीय नौदलासाठी एक समर्पित व्यासपीठ म्हणून एचएएलच्या तांत्रिक सामर्थ्याचे हे खरे प्रतिबिंब आहे.  एचएएल आणि आयआयएससीने कर्नाटकातील आयआयएससीच्या चालाकेरे संकुलात एक कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यासाठी करार केला आहे. स्थानिक समाजातील सदस्यांपासून ते उच्च-अभियांत्रिकी व्यावसायिकांपर्यंत विविध लाभार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रम प्रदान करणारे एक मॉडेल सुविधा तयार करणे हे या केंद्राचे लक्ष्य आहे.

बीईएलने पूर्णतः तयार  केलेले आणि विकसित केलेले लिनिअर व्हेरिएबल डिफरेन्शिअल ट्रान्सड्यूसर,हे लक्ष्य शोधण्यात अचूकता  प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे आणि भारतीय नौदलाला  उत्तम दीर्घकालीन सहाय्य प्रदान करण्यासाठी एचएफ एरियल स्विचिंग युनिटसाठी  आयात पर्याय म्हणून 1 केडब्ल्यू ट्रान्समीटर एरियल स्विचिंग रॅकची सुरूवात , ही अस्सल स्वदेशी उत्पादने आहेत.

संरक्षणमंत्र्यांनी  रिमोट बटण दाबून या उत्पादनांचे अनावरण केले. त्यांनी डीपीएसयू आणि आयुध कारखान्यांचे व्यवस्थापन आणि कर्मचार्‍यांचे स्वदेशी वस्तूंच्या उतपादनासाठी  केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन केले आणि ‘आत्मनिर्भर भारताच्या " प्रति त्यांच्या बांधिलकीचे कौतुक केले.  राजनाथ सिंह यांनी 07 ते 14 ऑगस्ट 2020 या कालावधीत 'आत्मनिर्भर सप्ताह" साजरा करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सचिव, संरक्षण उत्पादन आणि त्यांच्या गटाचे विशेष अभिनंदन केले. ते म्हणाले, "आज सुरू झालेल्या देशी उत्पादनांची आणि नवीन उत्पादनांची प्रभावी यादी मधून स्पष्ट होते कि डीपीएसयू आणि ऑर्डनन्स फॅक्टरीज 'आत्मनिर्भर भारत  अभियाना'चे प्रमुख चालक ठरतील आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वावलंबनासाठी अतुलनीय योगदान देतील. ते पुढे म्हणाले, आज बाजारात आणलेली काही उत्पादने केवळ संरक्षण क्षेत्राच्या गरजांची पूर्तता करणार नाहीत तर गरज भासल्यास नागरी समाजासाठीही उपयुक्त ठरतील. असे ते म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645624) Visitor Counter : 175