संरक्षण मंत्रालय

हवाईदल प्रमुखांची पश्चिमी हवाईतळाला भेट

Posted On: 13 AUG 2020 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

 

भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम एडीसी यांनी पश्चिमी हवाई तळाला 13 ऑगस्ट 20 रोजी भेट दिली. हवाई दल प्रमुखांचे आगमन झाल्यानंतर एअर ऑफीसर कमांडिंग यांनी त्यांचे स्वागत केले आणि हवाईतळाच्या तयारीविषयी आणि परिचालन स्थितीची माहिती दिली.

दिवसभराच्या भेटीत हवाईदलप्रमुखांनी परिचालन स्थितीच्या तयारीचा आढावा घेतला आणि आघाडीवर कर्तव्य बजावणाऱ्या हवाई योद्ध्यांशी संवाद साधला. हवाई योद्ध्यांनी तयारीचे उच्च निकष पाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या कोविड-19 संक्रमण परिस्थितीतही भारतीय हवाई दलाने लढाऊ क्षमतेचे प्रयत्न सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. 

भेटीदरम्यान सुरुवातीला, हवाईदल प्रमुखांनी रेसिडेंट स्कावॅड्रनसमवेत मिग-21 विमानाचे उड्डाण केले.

 

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645622) Visitor Counter : 134