पर्यटन मंत्रालय
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत स्वातंत्र्यदिन संकल्पनेवर दुसरा वेबिनार “सेल्युलर जेल : लेटर्स, मेमॉयर्स ॲण्ड मेमरीज” चे केले आयोजन
सेल्युलर तुरुंगाच्या गॅलरी आणि कारागृहातून उलगडला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रवास
आगामी वेबिनार जालियनवाला बाग : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक क्षण
Posted On:
12 AUG 2020 1:26PM by PIB Mumbai
74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देश सज्ज होत आहे, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यानिमित्त देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत 10 ऑगस्ट रोजी “सेल्युलर जेल : लेटर्स, मेमॉयर्स ॲण्ड मेमरीज या वेबिनारचे आयोजन केले होते.
देखो अपना देश मालिकेअंतर्गत “सेल्युलर जेल : लेटर्स, मेमॉयर्स & मेमरीज” या 46 व्या वेबिनारला निधी बन्सल, सीईओ, इंडिया सिटी वॉक्स & इंडिया विथ लोकल्स, डॉ सौमी रॉय, हेड ऑफ ऑपरेशन्स, इंडिया विथ लोकल्स अँड इंडिया हेरिटेज वॉक्स आणि सौमित्र सेनगुप्ता, सिटी एक्सप्लोरर, इंडिया सिटी वॉक्स यांनी संबोधित केले.
देखो अपना देश वेबिनार मालिका, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत समृद्ध भारतीय वैविध्यतेचे दर्शन घडवण्यासाठीचा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आहे.
या वेबिनारमध्ये सेल्युलर तुरुंगाच्या गॅलरी आणि कारागृहाच्या भिंतींमधून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रवास दर्शवण्यात आला. प्रसिद्ध राजकीय बंदी वीर सावरकर, बी.के.दत्त, फजल-ए-हक खैराबादी, बरींद्र कुमार घोष, सुशील दासगुप्ता यांच्या गाथा सादर करण्यात आल्या. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अंदमानमधील महत्त्वाच्या योगदानाचीही सादरीकरणातून माहिती देण्यात आली.
पर्यटन मंत्रालयाचे संचालक राजेश कुमार साहू यांनी समारोपाच्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवरील सबमरीन ऑप्टीकल फायबर केबलचा उल्लेख केला. या जोडणीमुळे बेटांवर आता अमर्याद संधी निर्माण होतील. पंतप्रधान म्हणाले, अंदमान आणि निकोबार बेटांना आता स्वस्त आणि चांगली जोडणी मिळाली आहे, त्यामुळे डिजीटल इंडिया, विशेषतः ऑनलाईन शिक्षण, टेलि-मेडिसीन, बँकींग व्यवस्था, ऑनलाईन व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल.
देखो अपना देश वेबिनार मालिका इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाच्या तंत्रज्ञान सहकार्याने सादर करण्यात येत आहे. वेबिनारची सत्रं https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured या युट्यूब लिंकवर आणि पर्यटन मंत्रालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत.
वेबिनार मालिकेअंतर्गत पुढील सत्र 14 ऑगस्ट 2020 रोजी, जालियनवाला बाग : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक वळण हे आहे आणि यात सहभागी होण्यासाठी: https://bit.ly/JallianwalaBaghDAD या संकेतस्थळाला भेट द्यावी.
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645331)
Visitor Counter : 147