भारतीय स्पर्धा आयोग

केहिन कॉर्पोरेशन, निसिन कोग्यो कंपनी, लि., शोवा कॉर्पोरेशन आणि हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टम्स, लि. यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या प्रस्तावित संयोजनास सीसीआय ने मान्यता दिली

Posted On: 11 AUG 2020 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) केहिन कॉर्पोरेशन, निसिन कोग्यो कंपनी, लि., शोआ कॉर्पोरेशन आणि हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टम्स, लि. यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या प्रस्तावित संयोजनास मान्यता दिली आहे.

प्रस्तावित संयोजन केहिन कॉर्पोरेशन (“केसी”), निसिन कोग्यो कंपनी, लिमिटेड (“एनकेसीएल”), शोआ कॉर्पोरेशन (“एससी”) आणि हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टम्स, लिमिटेड ("एचआयएएमएस"), होंडा मोटार कंपनी लि. (“एचएएमसीएल”) आणि हिताची लिमिटेड ("एचएल") दरम्यान संयुक्त उद्यम स्थापन करण्यासंबंधी आहे.

एचएएमसीएल ही जपानमध्ये समाविष्ट असलेली मर्यादित उत्तरदायित्व संयुक्त स्टॉक कॉर्पोरेशन आहे. एचएएमसीएल जागतिक स्तरावर मोटारसायकल, स्कूटर्स, ऑटोमोबाईल्स आणि उर्जा उत्पादनांचा विकास, उत्पादन आणि विक्री करते. भारतात एचएएमसीएल प्रामुख्याने वाहन आणि दुचाकी मोटार वाहनांचा व्यवसाय करते.

भारतात केसी आर अँड डी, ऑटोमोटिव्ह आणि मोटरसायकल घटकांचे उत्पादन आणि विक्री करण्यात गुंतलेला आहे. भारतात केसी ऑटोमोटिव्ह आणि मोटरसायकल घटकांचे संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्री करते.

गाडीच्या ब्रेकचे भाग बनविण्याच्या उद्देशाने जपानमध्ये एनकेसीएलची स्थापना करण्यात आली आहे. भारतात एनकेसीएल वाहनांसाठी एकत्रित ब्रेकिंग प्रणालीच्या निर्मिती आणि पुरवठ्याचे काम करते.

1938 मध्ये विमानाचे भाग तयार करण्यासाठी शोका एअरक्राफ्ट प्रेसिजन वर्क्स, लि. म्हणून एससीची स्थापना करण्यात आली होती. सध्या ही कंपनी मोटरसायकल आणि हायड्रॉलिक भाग , ऑटोमोटिव्ह भाग , ड्राईव्हट्रेन भाग आणि स्टीयरिंग प्रणालीच्या भागांचे उत्पादन करते. भारतात एससी वाहन आणि दुचाकी मोटार वाहनांसाठी शॉक शोषकची निर्मिती करते.

एचआयएएमएसचा 2009 मध्ये एचएलमध्ये समावेश करण्यात आला, त्याच्या ऑटो पार्ट्सच्या व्यवसाया पेक्षा याचे कार्यान्वयन वेगळे होते. एचआयएएमएस पॉवरट्रेन प्रणाली, चेसिस प्रणाली आणि प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली इत्यादी विकसित करणे, उत्पादन करणे, विक्री करणे आणि सेवा देणे हे कार्य करते. भारतात, एचआयएएमएस, त्याच्या सहाय्यक कंपन्यांमार्फत काम करत आहे, ब्रेकिंग सिस्टमच्या घटकांसह ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन, विपणन, विक्री आणि सेवा देण्याचे काम करते.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645189) Visitor Counter : 184