शिक्षण मंत्रालय

केंद्रिय शिक्षण मंत्र्यांनी वास्तुकला शिक्षण नियमनाचे किमान मानक 2020 ला केला प्रारंभ

Posted On: 11 AUG 2020 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

प्रासंगिक शैक्षणिक सुधारणांच्या प्रारंभी, शिक्षण मंत्रालयाद्वारे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज येथे व्हर्च्युअल पद्धतीने (आभासी) वास्तुकला शिक्षण नियमनाचे किमान मानक 2020 चा प्रारंभ केला. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आणि वास्तुकला परिषदेचे अध्यक्ष आर्किटेक्ट हबीब खान हे देखील या समारंभाला उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना पोखरियाल यांनी भारतातील स्मारके आणि मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण वास्तूकला यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले वास्तुकला परिषदेने (सीओए) वास्तुकलेच्या वर्तमान आणि भूतकाळाच्या खजिन्यातून प्रेरणा घ्यावी आणि स्थापत्य कलेच्या क्षेत्रात एक उल्लेखनीय बदल घडवून आणावा, जेणेकरून भारत पुन्हा जागतिक नेता बनू शकेल. परिषदेच्या तज्ज्ञांनी तयार केलेले हे नियम देशातील मानवी वस्तू आणि बनलेल्या वातावरणाच्या क्षेत्रात उद्भवणाऱ्या मुख्य चिंता आणि आव्हाने दूर करू शकतील आणि नाविन्यपूर्ण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात भारताला नवीन उच्च स्थान दोईल, असा विश्वास मंत्र्यांना होता. ते म्हणाले की, भारताची वास्तुकला त्याच्या इतिहास, संस्कृती आणि धर्मात रुजलेली आहे.

 

 

मंत्री म्हणाले की, 21 व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांवर या नव्या आणि दुमदुमणाऱ्या भारताचे भविष्य अवलंबून असल्याचे उद्दिष्ट पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा प्रारंभ करताना व्यक्त केले होते. एनईपीने बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुधारणांचा प्रस्ताव दिला आणि त्याच्या  अंमलबजावणीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. आणि हे नियम निश्चितपणे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्या प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणकडून (एनईपी) अनेक कल्पना आणि योजना अपेक्षित आहेत. ही मानके सुरू केल्याबद्दल त्यांनी वास्तुकला परिषदेचे आणि अर्किटेक्ट वास्तुकला परिषदेचे अध्यक्ष हबीब खान यांचे अभिनंदन केले आणि भविष्यात त्यांच्या सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना, धोत्रे म्हणाले की, या नियमनांमध्ये बरेच दिवस काम सुरू आहे आणि 1983 मध्ये झालेल्या आधीच्या नियमनांनंतर प्रदीर्घ प्रतीक्षा करून अखेर हा दिवस उजाडला आहे. तेव्हापासून जगभरात शिक्षणाच्या परिस्थितीत प्रचंड बदल झाला आहे. म्हणूनच देशातील वास्तूविषयक शिक्षणासंबंधीच्या नियमनांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आता आली आहे. प्राचीन शहरे, स्मारके, मंदिरे, इमारती इत्यादी सर्व श्रीमंत भारतीय सांस्कृतिक वारसा आणि विस्मयकारक वास्तुकलेचा नमुना आहेत. आधुनिक भारताच्या वास्तुकलेमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा करण्याची क्षमता आहे.

धोत्रे यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की या नियमनांमधील विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोन विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यास आणि सुधारित पद्धतीने विकसित करण्यास सक्षम करेल आणि 21 व्या शतकातील आव्हाने स्वीकारण्यासही सक्षम करेल.

Click here to see the detailed information on Minimum Standards of Architectural Education, Regulations 2020


* * *

M.Jaitly/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645173) Visitor Counter : 195