संरक्षण मंत्रालय
स्पष्टीकरण :स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचा आयातीच्या नकारात्मक (निगेटिव्ह) यादीत समावेश
Posted On:
10 AUG 2020 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020
संरक्षण मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केलेल्या आयातविषयक वस्तूंच्या प्रतिबंधित(निगेटिव्ह) यादीविषयी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. या यादीत, हलक्या वजनाची लढावू विमाने LCA Mark 1A, पिनाक रॉकेट यंत्रणा, आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा अशा स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे. येथे हे विशेषत्वाने नमूद करायचे आहे, की LCA MK 1A, पिनाक रॉकेट यंत्रणा, आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा या संरक्षण दलांच्या गरजांनुसार, त्यातील वैशिष्ट्यांची रचना करुन विकसित केल्या जातात. या यंत्रणा आंतरराष्ट्रीय बाजारातही उपलब्ध आहेत.
या अस्त्रप्रणालींचे आयात प्रतिबंधित उपकरणांच्या यादीत समाविष्ट करण्याचे कारण हे सुनिश्चित करणे आहे, की संरक्षण दले अशाप्रकारच्या यंत्रणांची बाहेरून आयात करणार नाहीत. याठिकाणी हे ही नमूद केले जाते की एखादे उत्पादन ‘स्वदेशी उत्पादन’ म्हणून गणले जाण्यासाठी त्यातील देशी बनावटीच्या साहित्याचे निश्चित प्रमाण असणे ही पूर्वअट आहे. त्यामुळे, उत्पादकांनी आपल्या उपकरणांमध्ये जास्तीत जास्त स्वदेशी बनावटीचे सुटे साहित्य वापरणे आणि आयातीत वस्तूंचे प्रमाण परवानगीपेक्षा जास्त होऊ न देणेही महत्वाचे आहे.
त्यामुळेच येथे हे स्पष्ट करण्यात येत आहे, की सध्या भारतात तयार होत असलेल्या मात्र, काही सुटे आयातीत भाग असलेली संरक्षण उपकरणे/यंत्रणा यांच्या उत्पादकांनी अशी उपकरणे अथवा वस्तू, ज्या समान दर्जाच्या आहेत, मात्र विविध नावांखाली त्यांचे करार केले जातात, अशा वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644822)
Visitor Counter : 295