भूविज्ञान मंत्रालय

युनेस्को-आयओसी त्सुनामी त्वरित ओळखण्यासाठी ओदिशात आज एका आभासी द्रुकश्राव्य कार्यक्रमाने होणार प्रारंभ

Posted On: 06 AUG 2020 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2020

ज्या ठिकाणी त्सुनामी येण्याचा धोका असतो तेथील लोकांना वेळेवर त्याचा अचूक इशारा मिळाला  तर त्यांचा जीव वाचविण्यासाठी  ते प्रयत्न करू शकतात,नुकसान कमी होते आणि प्रतिसाद वाढवता येतो,असे निदर्शनास आले आहे.वैज्ञानिक आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिका-यानी  यांच्या सतत प्रयत्नांनी आणि उत्तम सेन्सर्स, अचूक आदर्श प्रतिक्रुती आणि समवर्ती  प्रकारे  प्रसार करून त्सुनामीचा इशारा देण्याच्या तंत्रात भरीव  प्रगती केली आहे.   तथापि अधिकाऱ्यांनी असा इशाऱ्याची सार्वजनिक सूचना दिल्यानंतर तेथील लोक कशाप्रकारे  या इशाऱ्यावर कार्यवाही करतात त्यावर या इशाऱ्याचे यश अवलंबून असते. त्सुनामी नंतर जिवंत रहाणे  हे त्या  धोकादायक भागात रहाणाऱ्या  व्यक्तीने ही धोक्याची सूचना मिळाल्यानंतर ,अचूक निर्णय घेऊन लवकर कार्यवाही केल्यास  शक्य होते.

यूनेस्कोच्या इंटरगव्हर्नमेंटल ओशनोग्राफीक कमिशनने(IOC) त्सुनामी रेडी हा त्सुनामीच्या तयारीवर आधारित कार्यक्रम तयार केला असून लोकांचे सहकार्य मिळवून, नागरीक, समाजातील नेते आणि राष्ट्रीय आणि स्थानिक व्यवस्थापनाच्या मदतीने  सामाजिक कामगिरीवर आधारित कार्यक्रमाला आरंभ करणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट किनारपट्टीवरील लोकांना त्सुनामीच्या धोक्यासाठी तयार रहाणे ,जिवितहानी आणि मालमत्तेची  हानी कमी करणे आणि आणि समुदायाची रचनात्मक आणि पध्दतशीरपणे  उत्तम सराव संकेत तयार  व्हावेत यासाठी यूनेस्को-आयओसीच्या (UNESCO-IOC) इंटरगव्हर्नमेंटल कोआँर्डिनेशन ग्रूप फाँर इंडियन ओशन त्सुनामी वाँर्निंग अँड मिटिगेशन सिस्टीम (ICG/IOTWMS) यांनी  हा कार्यक्रम तयार केला आहे.या  मार्गदर्शक तत्वांची पूर्तता केल्यास समुदायाला    त्सुनामीच्या धोक्याचा इशारा  लवकरात लवकर  मिळून समुदायाची जनजागृती आणि प्रतिसादाची तयारी करण्यात लक्ष केंद्रित होते.

द इंडियन त्सुनामी अर्ली वाँर्निंग सेंटर(ITEWC), यांची इनकाँईस(INCOIS) ही संस्था भारतातील त्सुनामी सल्ला देणारी विभागीय संस्था आहे. हिंदी महासागरातील क्षेत्रात (25देशात) त्सुनामी संबंधीत सेवेची जबाबदारी यूनेस्कोला -आयओसीने  इनकाँईस(INCOIS) या संस्थेला दिली आहे. त्सुनामी बद्दल जनजागृती करण्यात आणि त्याची तयारी करण्यासाठी ईनकाँईसच्या वतीने किनारपट्टीवरील राज्यातील आणि  जिल्ह्यातील  आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसाठी(DMOs) नियमितपणे वर्कशॉप, प्रशिक्षण कार्यशाळा आणि सेमिनार(SOP) घेतल्या जातात. राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थांसाठी  आयटीईडब्ल्यूसी अँट ईनकाँईस(ITEWMC) तर्फे आयसीजी/आय ओटीडब्ल्यूएमएसच्या(ICG/IOTWMS) सोबत आयोवेव्ह त्सुनामी मॉक एक्सरसाईझेस  सहभागी लोकांना त्सुनामी वेळी येणाऱ्या कठीण काळासाठी  तयार रहाण्यासाठी दोन वर्षातून एकदा  आणि राष्ट्रीय पातळीवर दरवर्षाआड गृह मंत्रालय(MHA) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी [NDMA] तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठी(SDMA) मॉक प्रात्यक्षिके घेऊन तयारी बळकट करून घेतात . नुकतीच झालेली मॉक प्रात्यक्षिके  IO Wave18 (सप्टेंबर 2018)आणि मल्टीस्टेज माॉक एक्सरसाईझ (नोव्हेंबर 2017) ही त्सुनामीला तोंड देण्यासाठी  समुदायाला सक्षम  बनविण्याच्या द्रुष्टीने मोठी उदाहरणे आहेत. समुदायांचे अधिक सक्षमीकरण करण्यासाठी (DMO)सोबत आयटीईडब्ल्यूसी-इनकाँईसने (ITEWMS-INCOIS)त्सुनामी रेडी कार्यक्रम भारतात हाती घेतला आहे.

त्सुनामी रेडी कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी आणि आयोव्हेव्ह कसरती करण्यासाठी पृथ्वी मंत्रालयाने इनकाँईसच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मंडळाची स्थापना केली,ज्यात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सदस्य ,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गृहमंत्रालय, ओदिशा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अंदमान निकोबार द्वीपकल्पाच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे आणि इनकाँईसचे सदस्य होते.

ओदिशातील, ओदिशा राज्य आपत्कालीन व्यवस्थापनाने(OSDMA) त्सुनामी रेडी हा कार्यक्रम गंजम जिल्ह्यातील वेंकटरायपूर आणि जगतसिंगपूर जिल्ह्यातील नोलियासाही या गावात  कार्यक्रम राबविला आहे. मार्गदर्शक तत्वांनुसार दिलेल्या निर्देशांची पडताळणी करून यूनेस्को -आयओसीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात या गावांची गणना केली .नँशनल बोर्डाने सांगितल्याप्रमाणे यूनेस्को-आयओसीने वेंकटरायपूर आणि नोलियासाही या गावातील दोन समुदायांना त्सुनामी रेडी समुदाय म्हणून निश्चित  केले. यामुळे त्सुनामी रेडी हा कार्यक्रम हिंदी महासागर क्षेत्रात राबविणारा भारत हा पहिला देश तर ओदिशा हे पहिले राज्य ठरले आहे.

वेंकटरायपूर आणि नोलियासाही या गावातील लोकांना यूनेस्को- आयओसी (UNESCO-IOC)चे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि शिफारस पत्र देण्यासाठी एक वर्चुअल कार्यक्रम  इनकाँईस ,आयसीजी/ आयओटीडब्ल्यूएमएस सचिवालय आणि यूनेस्को- आयओसीआयच्या आयओटीआयसी तर्फे दिनांक 7आँगस्ट 2020 रोजी होणार आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी  विज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि प्रमुख अतिथी डॉ. एम राजीवनराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव सदस्यश्री.जी.व्ही.व्ही.सरमा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहून दोन गावांना आणि अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि शिफारस पत्र देणार आहेत.

यूनेस्को-आयओसीचे  आयसीजी/आयओटीडब्ल्यूएमएसचेएटीई चे(ICG/IOTWMS) प्रमुख डॉ. श्रीनिवासा कुमार तुम्माला आणि इंडियन ओशन त्सुनामी माहिती केंद्राचे(IOTIC) प्रमुख श्री. आर्डिटो एम कोडीजात हे अधिकारी, इंडोनेशियातील बीएमकेजीच्या(BMKG) आणि आयसीजी/आयओटीडब्ल्यूएमएसच्या (ICG/IOTWMS)अध्यक्ष  आणि संचालिका प्रा.द्विकोरीता कर्नावती यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ओदिशा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव (MD-OSDMA)श्री.प्रदिपकुमार जेना,ओएसडीएम ए चे व्यवस्थापकीय संचालक ,वेंकटरायपूर आणि नोलियासाही समुदायातील अधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि प्रशस्तीपत्र वाटणार आहेत. आयओसी -यूनेस्कोचे उपाध्यक्ष[IOC-UNESCO] डॉ.श्री.एस. एस.सी.शेनाँय आयएनसीओआयएस चे माजी संचालक आणि नँशनल बोर्डाचे अध्यक्ष[I/C,(INCOIS) डॉ.  टी. एम. बालक्रीष्णन नायर, टीडब्ल्यूजी[TWG,INCOIS]ईनकाँईसचे ई.पट्टाभी रामा राव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. याशिवाय इतर सहभागी व्यक्तींमध्ये ईशान्य भारत मंत्रालयातील (MoES) इतर अधिकारी आणि नँशनल बोर्डाच्या सदस्यांचा(NDMA,MHA,OSDMA,A&N DDM) समावेश असेल.

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644751) Visitor Counter : 270